रामाच्या नावावर भाजपची ‘भामटेगिरी’, राममंदिराचा केला फुटबॉल : उद्धव ठाकरे

रामाच्या नावार सध्या जी भामटेगिरी सुरू आहे ती ताबडतोब थांबवा आणि देशवासियांच्या मनातली बात करा अशी कडक टीकाही उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखातून केलीय.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2018 10:24 AM IST

रामाच्या नावावर भाजपची ‘भामटेगिरी’, राममंदिराचा केला फुटबॉल : उद्धव ठाकरे

मुंबई,ता,22 ऑगस्ट : अयोध्येतल्या राम मंदिरावरून शिवसेनेने भाजपला खडे बोल सुनावले आहेत. रामाच्या नावार सध्या जी भामटेगिरी सुरू आहे ती ताबडतोब थांबवा आणि देशवासियांच्या मनातली बात करा अशी कडक टीकाही उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखातून केलीय. लांगुलचालनाच्या राजकारणाने राममंदिराचा मार्ग खूप काळापासून रोखून धरला होता असं वक्तव्य उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मोर्य यांनी केलं होतं त्याचा आधार घेत या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आलीय. राम मंदिराचा मुद्दा हा न्यायालयाच्या मार्गाने किंवा सांमज्यस्याने सुटायला पाहिजे असं भाजपची भूमिका आहे. मात्र हा मुद्दा कधीच सामंज्यस्यानी सुटणार नाही त्यासाठी संसदेत कायदा करून मंदिराचा मार्ग मोकळा करा अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेनं आता भाजपला टार्गेट केलं आहे.

राम मंदिराचा फुटबॉल

भाजपच्या राज्यात राममंदिराचा फुटबॉल झाला आहे. ज्या रामाने सध्याचे ‘अच्छे दिन’ दाखवले त्यास फुटबॉलप्रमाणे इकडून तिकडे उडवले जात आहे. निवडणुका जसजशा जवळ येतात तसा हा फुटबॉलचा खेळ रंगत जातो. मंदिर निर्माणाचे सर्व पर्याय संपले तर संसदेच्या माध्यमातून मंदिर उभारण्याच्या दिशेने प्रयत्न करू, असे केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले आहे. मौर्य हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जो संसदेचा अयोध्या मार्ग सांगितला आहे तो सर्व प्रकार रामभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा आहे. राममंदिराचा खेळ त्यांना आणखी दोन-चार निवडणुकांच्या मैदानात खेळायचा आहे. परस्पर सामंजस्य आणि सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय आधीच्या राजवटीतसुद्धा खुला होता व तशी पावले पडत होतीच. काँग्रेस किंवा समाजवादी पार्टीचे लोक राममंदिर बांधू शकले नाहीत म्हणून लोकांनी भाजपास उत्तर प्रदेशात आणि देशात सत्ता दिली. भाजपवाले आता अयोध्याप्रश्नी संसदेचा पर्याय समोर आणत आहेत. म्हणजे ते नक्की काय करणार आहेत? राममंदिरासाठी कायदा करू किंवा राष्ट्रपतीच्या सहीने आदेश काढू, असे बहुधा त्यांना म्हणायचे असावे, पण मग त्यासाठी ते कुणाची वाट पाहत आहेत?

बहुमत उद्या असणार नाही

आज संसदेत तुम्हाला बहुमत आहे. 2019 मध्ये संसदेत काय चित्र असेल ते कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे राममंदिराचा कायदा होईल तो आताच व त्यासाठी संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे लागले तरी हरकत नाही. ज्यांना राममंदिर अयोध्येत हवे आहे ते भाजप, शिवसेना वगैरे पक्षांचे खासदार या विशेष अधिवेशनाचे कोणतेही भत्ते वगैरे घेणार नाहीत. त्यामुळे रामाच्या बाजूने कोण व बाबराचे भक्त कोण याचा फैसला संसदेतच होऊ द्या. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळय़ात पंतप्रधान मोदी यांनी भगवी पगडी घालून भाषण केले. त्या पगडीमागे काय दडलंय? रामप्रभू वनवासातच आहेत आणि आम्ही फक्त भगव्या पगडय़ा घालत आहोत. खरे म्हणजे ‘राममंदिर होईपर्यंत डोक्यावर भगवी पगडी घालणार नाही’ असे आता पंतप्रधान मोदी यांनी सांगायला हवे. राममंदिराचा प्रश्न आणखी किती काळ लटकवत ठेवणार आहात आणि सर्वोच्च न्यायालयाकडे बोटे दाखवून तीच बोटे किती काळ चाटत बसणार आहात असा प्रश्न सध्या रामभक्तांच्या मनात आहे.

Loading...

पगडी मागे दडलंय काय?

रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी हे आमचे परखड मत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळय़ात पंतप्रधान मोदी यांनी भगवी पगडी घालून भाषण केले. त्या पगडीमागे काय दडलंय? रामप्रभू वनवासातच आहेत आणि आम्ही फक्त भगव्या पगडय़ा घालत आहोत. खरे म्हणजे ‘राममंदिर होईपर्यंत डोक्यावर भगवी पगडी घालणार नाही’ असे आता पंतप्रधान मोदी यांनी सांगायला हवे. राममंदिराचा प्रश्न आणखी किती काळ लटकवत ठेवणार आहात आणि सर्वोच्च न्यायालयाकडे बोटे दाखवून तीच बोटे किती काळ चाटत बसणार आहात असा प्रश्न सध्या रामभक्तांच्या मनात आहे. त्याचे उत्तर केंद्रातील आणि उत्तर प्रदेशातील राज्यकर्त्यांनीच द्यायचे आहे. मुळात राममंदिराचा प्रश्न परस्पर सामंजस्याने सुटेल हे शक्य नाही.

VIDEO : गडचिरोलीत पूरात अडकलेल्या सी-60 कमांडोच्या सुटकेचा थरार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 10:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...