नागरिकत्त्व कायदा आणि सावरकर वादावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला फटकारले, म्हणाले....

नागरिकत्त्व कायदा आणि सावरकर वादावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला फटकारले, म्हणाले....

नागपूरमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर एकच टीकास्त्र सोडलं.

  • Share this:

नागपूर, 16 डिसेंबर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं सावरकर यांच्याबद्दल विधान आणि नागरिकत्त्व कायद्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी आणि भाजपवर जोरदार पलटवार केला. हिंदूत्व हे शिवसेनेला शिकवू नका, असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला. तसंच अच्छे दिनचं काय झालं ? असा टोलाही त्यांनी लगावला.

नागपूरमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर एकच टीकास्त्र सोडलं.

सावरकरांचा विषय हाताळण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. भाजपसोबत युती का झाली होती. देशाची फाळणी झाली होती तेव्हा संपूर्ण काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत भारत हा अखंड झाला पाहिजे. पाकिस्तान, बांगलादेशपासून ते सर्व अखंड भारत झाला पाहिजे, हे सावरकरांचं स्वन्न होतं. ते पूर्ण झालं पाहिजे. यासाठी युती झाली होती, अशी आठवणही ठाकरेंनी करून दिली.

उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार त्यासाठी आम्ही इथं बसलो आहोत. अच्छे दिन कधी येणार हे विचारल्यावर तुमची बोबडी का वळली होती,  नोटबंदी केल्यानंतर 50 दिवस द्या म्हणून मागितले आता किती दिवस झाले. 50 चे तर पाढे झाले आहे. पण आला का काळा पैसा? तुम्ही काय बोलले होते, ते आठवा. उगाच आम्हाला आठवण करून देऊ नका, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचं नाव न घेता लगावला.

नागरिकत्त्व कायद्यावरून उत्तर

देशात आज भयावह परिस्थिती आहे. नागरिकत्त्व कायद्यावर काय भूमिका आहे, असे प्रश्न विचारले जात आहे. जे निर्वासित भारतात येणार आहे. हे हिंदू येणार किंवा अल्पसंख्याक आहे. त्यांना खुशाल घ्या. पण, कर्नाटकमध्ये भाजप सरकार आहे. त्याच्याशेजारी बेळगाव, कारवार, निप्पाणी आहे. तिथे मराठी बांधवांवर गेल्या कित्येक वर्षांपासून अत्याचार होत आहे. गेल्या 5 वर्षांत त्यांच्यावर अत्याचार झाले ते किती कमी केले का? केंद्रात तुम्हीच आहात ना मग मराठी माणसांवर तिथे अन्याय का होतो? ते हिंदू नाहीत का?, असा थेट सवालही त्यांनी विचारला.

'आम्ही लगेच काही धर्मांतर केलं नाही'

आम्ही हिंदुत्वावादीच आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो म्हणून आम्ही लगेच काही धर्मांतर केलं नाही. 2014 साली ज्या पक्षाने युती तोडली तेव्हाही हिंदू होतो आणि आजही हिंदूच आहोत. पण हिंदुत्त्वाचा बुरखा घालून देशाच्या मुळावर खाव घालत असाल तर ते सहन करणार नाही, असा घणाघाती प्रहार उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला.

तुमचा कुटुंब प्रमुख आज राज्याचा मुख्यमंत्री आहे.पण म्हणून आपलं सरकार हे पहिल्या सरकार सारखं वागलं पाहिजे हे खपवून घेणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2019 08:31 PM IST

ताज्या बातम्या