'तुम्ही 56 काय 156 जरी एकत्र आलात तरी भगवा फडकणारच'

'तुम्ही 56 काय 156 जरी एकत्र आलात तरी भगवा फडकणारच'

'विरोधकांनी आरोप करा पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शेतकऱ्याबाबत बोलू नये. शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारींचा मोर्चा आला होता. त्यांना आज कोर्टाने न्याय दिला मात्र काँग्रेस सरकारने दिला नाही.'

  • Share this:

यवतमाळ, 08 एप्रिल : पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचे अवघे 24 तास उरले आहेत. त्यामुळे प्रचारसभांची लगबग वाढली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळींच्या प्रचारार्थ आज उद्धव ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली होती. मतदारसंघातील राज्यमंत्री संजय राठोड आणि भावना गवळी यांचे मतभेद बघता उद्धव ठाकरेंचे भाषण महत्वाचं ठरलं आहे.

'विरोधी पक्षाच्या फुग्याला खूप भोकं पडली आहेत, त्यामुळे आता हा फुगा फुगणार नाही तर तुम्ही 56 काय 156 जरी एकत्र आलात तरी भगवा फडकणारच' अशी टीका उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केली आहे.

'विरोधकांनी आरोप करा पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शेतकऱ्याबाबत बोलू नये. शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारींचा मोर्चा आला होता. त्यांना आज कोर्टाने न्याय दिला मात्र काँग्रेस सरकारने दिला नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विऱोधकांवर जोरदार टीका केली.

ते पुढे म्हणाले की, 'नाशिकमधून लाल बावटा घेवून शेतकरी आले होते. तेव्हा मी झेंड्याचा लाल रंग नाही तर त्यांच्या रक्ताचा लाल रंग बघितला आणि त्यांना मदत करण्याचे आदेश आमदार आणि मंत्र्याना दिले. पण गोवारी मोर्चावर तुम्ही केलेल्या गोळीबाराचं रक्त तुम्ही धुतलं पण जणता विसरली नाही. मला त्या घटनेची लाज वाटते.'

'मी कर्जमाफीसाठी प्रयत्न केला मात्र मला कर्जमाफी नको कर्जमुक्ती पाहिजे. माफी आरोपीला देतात. माझा शेतकरी आरोपी नाही' असंही उद्धव ठाकरे म्हणाले. बरं इतकंच नाही तर 'मी उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचा सुपुत्र वचन देतो तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही' अशी शपथही उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर घेतली.

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे...

- मत मागताना शेतकऱ्यांच्या घरात जावून आत्महत्या न करण्याबाबत सांगा, 'मी आहे असं म्हणून, आधार द्या.

- आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण देणार हे माझं वचन आहे.

- अवनीला जिवंत ठेवायला पाहिजे होतं. हे माझे मत आहे. मात्र मी झालेले नुकसान बघितलं.

- मला शेतीतलं कळत नाही असे आरोप केले गेले. हो, मला शेतीतलं कळत नाही मात्र शेतकऱ्यांचे आश्रू कळतात.

- प्रत्येक राजकिय पक्षांना आश्वासन द्यावं लागतं. मात्र आम्ही काश्मीरचं 370 कलम काढणार.

- राहूल गांधी स्वत:ला आजच पंतप्रधान समजत आहेत. पण 370 कलम रद्द करण्यासाठी ते नाही म्हणतात. त्यांना लाज नाही का वाटत?

- देशद्रोहाचा कायदा काढण्याची भाषा काँग्रेस करते. काही लोकांच्या दबावात हे कलम काढणारेच देशद्रोही आहेत.

- शिवसेना लाचार झाली असं म्हणणारे आहेत. मात्र, मी देशासाठी युती केली.

- या देशात राहायचं असेल तर 'देश के तुकडे झाले पाहिजे' म्हणणाऱ्यांचे तुकडे केले पाहिजे.

- आम्हाला काही हवंय म्हणून युती केली नाही. आम्हाला काहीतरी द्यायचं आहे म्हणून युती केली.

- राज्यातील ४८ जागा शिवसेना-भाजपा युती जिंकेल.

- ५६ जणांनी एकत्र येवून एकमुखाने पंतप्रधानांच नाव घोषित करा.

VIDEO : अब्दुल सत्तारांची लोकसभेतून माघार, पण भाजपबद्दल केलं बुचकळ्यात टाकणारं विधान

First published: April 8, 2019, 8:58 PM IST

ताज्या बातम्या