काँग्रेस पाठिंब्याच्या चर्चेनंतर शिवसेनेची महत्त्वाची बैठक, उद्धव ठाकरे 'इन अॅक्शन'

काँग्रेस पाठिंब्याच्या चर्चेनंतर शिवसेनेची महत्त्वाची बैठक, उद्धव ठाकरे 'इन अॅक्शन'

काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या अनुषंगाने शिवसेना काँग्रेसचा पाठिंबा घेत भाजपला धक्का देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर : सध्या राज्यात शिवसेना-भाजप मध्ये सत्तासंघर्ष अधिक वाढल्याचे पाहायला मिळतं. राज्यपाल यांनी भाजपाला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिल्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. सध्या शिवसेनेच्या आमदारांना मालाडमध्ये द रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याठिकाणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, गजानन कीर्तिकर, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, अनिल देसाई  यांनी काल रात्री उशिरा हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली आहे. तर आज उद्धव ठाकरेही आमदारांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.

सेना आमदार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक इथे पार पडणार आहे. एकीकडे काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या अनुषंगाने शिवसेना काँग्रेसचा पाठिंबा घेत भाजपला धक्का देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, भाजपसोबत युतीत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना इच्छुक नसल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

काँग्रेस आमचा दुश्मन नाही  

काँग्रेस राज्याचा दुश्मन नाही असं शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत असा दावाही त्यांनी केला. राज्यतली अस्थिरता संपावी अशीच शिवसेनेची भूमिका असल्याचंही ते म्हणालेत. भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण देण्यात आल्याचं त्यांनी स्वागत केलं. भाजपनं 24 तासांत सत्ता स्थापनेचा दावा करायला हवा होता असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राष्ट्रवादीकडे चांगले नेते होते आणि आहेत असंही राऊत म्हणालेत. राऊतांच्या काँग्रेसबद्दलच्या विधानामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलं आहे.

इतर बातम्या - राजकारणात भुकंप: भाजपला सगळ्यात मोठा धक्का, काँग्रेस देणार शिवसेनेला पाठिंबा

कोण असेल शिवसेनेचा मुख्यमंत्री?

राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना मुख्यमंत्री शिवसेनेचाचं असेल असं ठणकाऊन सांगणाऱ्या शिवसेनेमध्ये मात्र मुख्यमंत्री कोण व्हावा यावरून दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. मातोश्रीबाहेरच दोन वेगळी पोस्टर्स लागल्याचं दिसून येत आहे. एकीकडे आदित्य ठाकरेंचा फोटो आहे तर तिथेच दुसऱ्या पोस्टरवर उद्धव ठाकरेंचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे की उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

इतर बातम्या - शोले पार्ट 2! एकतर्फी प्रेमवीराने चक्क प्रेयसीच्या घरासमोरील भिंत पाडली, कारण...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल

राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिलं आहे. जी प्रक्रिया आता सुरू झाली ती अगोदर होऊ शकत होती. घोडेबाजार सुरू होऊ नये यासाठी राज्यपालांनी लक्ष दिलं पाहिजे. भाजपाची सत्ता स्थापन झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल. पटलावर सरकार पडल्यानंतर शिवसेनेने त्यांच्याविरोधात मतदान केलं आणि पटलावर सरकार पडलं तर पर्यायी सरकार निर्माण करण्याबाबत पक्ष विचार करू शकतो, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

इतर बातम्या - चाकूचे 3 वार आणि मैत्रीचा 'दी एन्ड', दोस्तानेच केली तरुणाची निर्घृण हत्या

शरद पवारांच्या उपस्थितीत १२ नोव्हेंबरला मुंबईत बैठक

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक १२ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही आमदार नवाब मलिक यांनी दिली.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 10, 2019, 1:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading