मुंबई, 7 मार्च : शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. औरंगाबादच्या कचराकोंडीवरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाना साधलाय. कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एक इंचही जमीन देणार असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं. महापालिकेला जागा देणार नसला तर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनीच उचलली पाहिजे. या प्रश्नावर जनतेत राग आहे, हा राग लक्षात घेऊनच आदित्य ठाकरे या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना भेटले अशी माहितीही त्यांनी दिली.
औरंगाबादमध्ये शिवसेना आणि भाजप दिर्घकाळापासून सत्तेवर आहेत. तर सध्या शिवसेनेची सत्ता आहे. प्रत्येक महापालिकेने शहरात तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावावी असं सरकारचं धोरण आहे. त्यामुळं हा प्रश्न पालिकेने सोडवावा अशी भूमिका घेता सरकारनं घेतलीय. त्यावर आता शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय.
तोडफोड करणं चुकीचं
पुतळ्याच्या तोडफोडीवरून सुरू असलेल्या राजकारणावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या स्वभावापेक्षा वेगळी भूमिका मांडली. पुतळे तोडणं, फोडणं हे चुकीचं असून त्यापेक्षा ते पुतळे संग्रहालयात ठेवावे असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला. कम्युनिष्ट नेत्यांचे पुतळे फोडण्यापेक्षा त्या विचारांची राजवट असलेले चीन सारखे देश फोडले पाहिजे असंही ते म्हणाले.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.