• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: उद्धव ठाकरेंचा नाव न घेता मोदींवर हल्लाबोल
  • VIDEO: उद्धव ठाकरेंचा नाव न घेता मोदींवर हल्लाबोल

    News18 Lokmat | Published On: Feb 5, 2019 11:17 AM IST | Updated On: Feb 5, 2019 11:17 AM IST

    मुंबई, 05 फेब्रुवारी : एकीकडे युतीच्या शक्यतेची चर्चा सुरू असताना शिवसेनेकडून सोडले जाणारे विखारी बाण काही थांबत नाही आहेत. निवडणुका जवळ येत असताना एकमेकांवर टीका करण्यासाठी सगळेच नेते एकमेकांवर चिखलफेक करताना दिसताहेत. तर नुकतच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाममध्ये मोदी एकटे वाघ आणि बाकी सगळे कुत्रे असं म्हटलं होतं तर दुसरीकडे खासदार पूनम महाजन यांनी शरद पवारांना शकुनी मामाची उपमा दिली. तर आता जनतेला भूलथापा देणाऱ्या ढोंगी मांत्रिकाच्या तावडीतून देशाला सोडवायला हवं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading