आगामी निवडणुकांसंदर्भात उद्धव यांनी पत्ते ठेवलेत राखुन!

आगामी निवडणुकांसंदर्भात उद्धव यांनी पत्ते ठेवलेत राखुन!

  • Share this:

पुणे, ता. १४ जुलै : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सद्धा पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी पाच वर्षे झालीत आम्ही भांडतोय, पण येत्या निवडणुकीत एकत्र येऊच नाही असे विधान करुन आगामी निवडणुकांसंदर्भातले सर्व पत्ते राखुन ठेवलेत. यावेळी त्यांनी राम मंदिर, नाणार प्रकल्प, समृद्धी महामार्ग आणि मुंबईतील खड्ड्यांवर त्यांचे मत स्पष्ट केले.

नोटबंदीसारखं राम मंदिर का होऊ शकत नाही? -उद्धव ठाकरे

राज्यसभा सदस्यपदी आता सचिन आणि रेखा नाहीत; या चार जणांची नियुक्ती!

गेल्या निवडणुकांच्या वेळेस भाजपने विकासाचा मुद्दा उचलून धरला होता, तो पूर्ण होत नाही तोच आगामि निवडणुकांपूर्विच भाजपने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरलाय. राम मंदिर उभारणीला माझा विरोध नाही, पण आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने चालवलेली ही खेळी चक्क देशातल्या जनतेची दिशाभूल करणारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राम मंदिराच्या मुद्द्यामुळे विकासाचा मुद्दा बाजुला पडलाय की काय असं आता वाटायला लागलंय असे ते म्हणाले.

2019च्या निवडणूकीपूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करू - अमित शहा

आहे फक्त एकच हात पण लगावतो जबरदस्त षटकार !

नाणार प्रकल्प आणि समृद्धी महामार्ग यांवर बोलतांना ते म्हणाले की, हे दोन्ही विषय वेगवेगळे असून नाणार प्रकल्प अजिबात होऊ देणार नसल्याची ठाम भूमीका त्यांनी यावेळी मांडली. हा विषय संपलेला असतांना मुख्यमंत्री परत-परत तोच मुद्दा का चघळत असल्याचा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. समृद्धी महामार्ग व्हावा ही आमची देखील ईच्छा आहे. मात्र तो सुपीक जमिनी बळकावून होता कामा नये. त्याचसाठीच तर शेतकऱ्यांनी विरोध केला आणि शासनाला मार्ग बदलण्यास भाग पाडले.

कोल्हापूरात पतीने खुरप्याने वार करून केली पत्नीची निर्घृण हत्या

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डयांसदंर्भात बोलताना केवळ शासना नव्हे, तर जनता देखील त्यास तीतकीच जबाबदार असल्याचे मत त्यांनी स्पष्ट केली. रस्त्यांवरील खड्डयांमुळे एकही अपघात होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी असेही आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.

 

First published: July 14, 2018, 6:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading