डीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब!

डीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब!

'डॉल्बी वाजणारच, हवे तर माझ्यावर गुन्हे दाखल करा' अशी गर्जना करणारे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे गणेश विसर्जनाच्या मुख्य मिरवणुकीत साताऱ्यात दिसलेच नाहीत.

  • Share this:

सातारा, 24 सप्टेंबर: जब तक रहेगा गणपती तब तक बजेगी डॉल्बी', 'कोण कोर्ट, कसला कायदा', 'डॉल्बी वाजणारच, हवे तर माझ्यावर गुन्हे दाखल करा' अशी गर्जना करणारे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे गणेश विसर्जनाच्या मुख्य मिरवणुकीत साताऱ्यात दिसलेच नाहीत. तर दुसरीकडे पोलिसांनी आखलेल्या व्ह्यू रचनेमुळे साताऱ्यातून डीजे हद्दपार झाल्‍याचे पाहायला मिळालं.

गेल्‍या एक महिन्यापासून साताऱ्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. यंदा गणेशोत्सवमध्ये नेमके काय होणार? याची चर्चा जिल्ह्यासह राज्यात सुरु होती. कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी विश्वास नांगरे-पाटील यांनीही साताऱ्यात येऊन डीजेला बंदीच राहील. आमचा लोकप्रतिनिधींशी संघर्ष नाही मात्र कायदा सर्वांना समान राहील. तसेच डीजे बाबत उच्च न्यायालय जो निर्णय घेईल, त्याची कडक अंमलबजावणी केली जाईल, अशी ठासून भूमिका मांडल्याने खा. उदयनराजे भोसले विरुद्ध पोलीस प्रशासन असा बाका प्रसंगही साताऱ्यात उभा राहिला.

मुख्य विसर्जनाला सुरुवात झाली. सातारच्या दोन्ही रस्त्यांवर पारंपरिक वाद्यांसह ढोल-ताशाच्या निनादात मिरवणुकीला सुरुवात झाली. रात्री बारा वाजले तरी कुठेही डीजे वाजला नाही. तर सातारचे खासदार उदयनराजे भोसले त्यांचे दर्शनही झाले नाही. कामानिमित्त ते सातारा बाहेर होते, असं सांगण्यात येतंय.

दरम्यान, दुसरीकडे आ. शिवेंद्रराजे भोसले या परिस्थितीत गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यावर नाचले. रात्री बाराचा ठोका पडल्यानंतर पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पारंपारिक वाद्यही बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सर्व मंडळांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. वाद्ये बंद झाल्यानंतर मोती चौकातून राधिका रोड मार्गे कृत्रिम तळ्यावर वाहने मार्गस्थ होत होती.

 पुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल

First published: September 24, 2018, 9:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading