राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

शहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी महाराष्ट्रातील जेष्ठ नेत्यांसोबत शुक्रवारी रात्री गृ​हमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीत महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून मिळाली आहे. सोबतच  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे आहे.

येत्या 2 ए​प्रिलला उदनराजे भोसले उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. राज्यसभा निवडणुकीसह राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावरही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील वर्तमान राजकीय स्थितीवरही राज्यातील नेत्यांनी अमित शहा यांना माहिती दिल्याचे वृत्त आहे.

इतर बातम्या - केजरीवालांची CM म्हणून केली नियुक्ती, रविवारी या 6 मंत्र्यांसोबत घेणार शपथ

भाजप नेत्यांनी दुपारी पक्ष मुख्यालयात जावून राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची ही भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली होती. राज्यसभेच्या 7 जागा 2 एप्रिल 2020 ला रिक्त होत आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत त्यासाठीची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. जे सात सदस्य निवृत्त होणार आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीकडून शरद पवार, भाजपकडून रामदास आठवले परत राज्यसभेवर येणार यात शंका नाही. महाविकास आघाडीचे संख्याबळाकडे दृष्टीक्षेप टाकला, तर त्यांचे 7 पैकी 4 खासदार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादीला दोन खासदार, शिवसेनेला एक, काँग्रेसला एक अशी विभागणी त्यामुळे होवू शकते. शिवसेनेच्या मदतीची भरपाई पुढच्या वेळी त्यांना अधिक सीट देऊन केली जाऊ शकते अशी चर्चा आहे. महाराष्ट्रातून एकूण 19 खासदार राज्यसभेवर जातात. दर दोन वर्षांनी 7, 6 आणि 6 अशा जागा रिक्त होतात. सहा वर्षांपूर्वी जेव्हा 7 जागांसाठी निवड झाली होती तेव्हा ती बिनविरोध झाली होती. आता याहीवेळी ही निवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First published: February 15, 2020, 8:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading