Home /News /news /

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी उदयन राजेंकडून भिडे गुरूजींची पाठराखण

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी उदयन राजेंकडून भिडे गुरूजींची पाठराखण

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार आणि शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संभाजी भिडे गुरूजी यांची पाठराखण केलीय. भिडे गुरूजी हे वडिलधारी आहेत. त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांची लायकी काय ? असा खडा सवालच उदयनराजेंनी उपस्थित केलाय.

पुढे वाचा ...
05 जानेवारी, नवी दिल्ली : कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार आणि शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संभाजी भिडे गुरूजी यांची पाठराखण केलीय. भिडे गुरूजी हे वडिलधारी आहेत. त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांची लायकी काय ? असा खडा सवालच उदयनराजेंनी उपस्थित केलाय. खा. उदयनराजे म्हणाले, ''संभाजी भिडे यांच्याबाबत मनात आदर आहे, ते मॅथेमॅटिक्स विषयाचे प्रॉफेसर होते. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर माझे गुरुजींसोबत बोलणे झाले, त्यावेळी बोलताना गुरुजी रडले, असे उदयनराजे यांनी सांगितले. तसंच संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही, असेदेखील उदयनराजेंनी ठणकावून सांगितले आहे. जातीच्या आधारावर देशाचे तुकडे होण्याआधी माझे डोळे मिटलेले बरे. देशाचे तुकडे झालेले मला सहन होणार नाही, असंही उदयनराजे भोसलेंनी म्हटलंय. शिवाय समाजात तेढ निर्माण करणा-यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीदेखील उदयनराजे भोसले यांनी केली आहे. हिंसाचारामुळे दोन हजार कोटींचं नुकसान, उद्रेक करणारी वक्तव्यं करु नयेत, असं आवाहनदेखील यावेळी उदयनराजेंनी केले.
First published:

Tags: Koregoan bhima controversy, Sambhaji bhide, Udayan raje, कोरेगाव भीमा दंगल, खा. उदयन राजे भोसले, संभाजी भिडे

पुढील बातम्या