07 जून : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना अटक होऊ शकते. एका खंडणी प्रकरणात कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन नाकारलाय. याआधी याच प्रकरणात ९ जणांना अटक झालीय.
या प्रकरणी पुरावे तपासून निर्णय घेऊ, अशी माहिती दिलीय कोल्हापूर रेंजचे विशेष आयजी विश्वास नांगरे पाटील यांनी दिलीये. कायदा सर्वांसाठी समान आहे असंही नांगरे पाटील यांनी म्हटलंय. पण उदयनराजेंचं राजकीय वजन पाहता त्यांना अटक होते का ते पाहायचं..
काय आहे उदय राजेंवरचं खंडणीचं प्रकरण ?
साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर लोणंद औद्योगिक वसाहतीमधील सोना अलॉईज कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा 22 मार्च ला सातारा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर त्याचा 9 साथीदारांना पोलिसांनी अटक करून सातारा जिल्हान्यायालायत हजर केले होते. या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली मात्र उदयनराजे यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकत होती. मात्र, गेली 2 महिने ही अटक होऊ शकली नाही. उदयनराजे सध्या साताऱ्यात देखील नाहीत त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.