News18 Lokmat

उदय चोप्रा म्हणतोय, गांजा अधिकृत करा!

उदय चोप्रा सध्या चर्चेत आलाय. तो नेहमीच सोशल मीडियावर कार्यरत असतो. पण आता तो चांगलाच ट्रोल झालाय.

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2018 05:29 PM IST

उदय चोप्रा म्हणतोय, गांजा अधिकृत करा!

मुंबई, 15 सप्टेंबर : उदय चोप्रा सध्या चर्चेत आलाय. तो नेहमीच सोशल मीडियावर कार्यरत असतो. पण आता तो चांगलाच ट्रोल झालाय. याचं कारण म्हणजे त्यानं गांजा कसा चांगला, हे पटवून देण्याचा प्रयत्न केलाय.

तो म्हणतोय, गांजा हा सरकारनं अधिकृत करावा. त्यामुळे गुन्हेही कमी होतील आणि गांजा आरोग्याला उपयोगी असतो. त्यावर लोकांनी त्याच्यावर बरीच टीका केलीय. त्याला अक्षरश: ट्रोल केलंय. उदय चोप्रा सगळ्यांना हेच योग्य हे पटवून देतोय.

Loading...

उदय चोप्रा ट्रोल होणं काही नवं नाही. मध्यंतरी कर्नाटकची निवडणूक झाली.  भाजपच्या येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हा उदयने या ट्विटमध्ये लिहलं की, "मी कर्नाटकच्या राज्यपालांबद्दल गुगलवर शोधलं. ते भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहे. मला असं वाटतं की आता आपलं काय होणार हे आता सगळ्यांनाच माहीत आहे?'

पण उदय चोपडाचं हे ट्विट त्याच्या चाहत्यांना काही आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. बॉलिवूडचा राहुल गांधी असं ट्विट करत त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं.

या ट्विटवर एवढ्या टीका झाल्यानंतर त्याने आणखी एक ट्विट लिहिलं.  त्यात तो म्हणाला की, 'माझ्या ट्विटवर इतकं ट्रोल केलं. पण मी एक भारतीय नागरिक आहे. मला भारताची काळजी आहे.' पण तुमच्या विचारांना डावलण्याची माझी हिंमत नाही.'

PHOTOS : राणा आणि पाठकबाईंनी आणला इको फ्रेंडली गणपती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 15, 2018 05:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...