मनमोहन सिंगांच्या काळात ३ वेळा झाले सर्जिकल स्ट्राईक -राहुल गांधी

नोटबंदी हा मोठा घोटाळा आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे लघुउद्योजकांचं कंबरडं मोडलं. त्यामुळे मोठ्या उद्योजकांचा मार्ग मोकळा झाला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 1, 2018 06:23 PM IST

मनमोहन सिंगांच्या काळात ३ वेळा झाले सर्जिकल स्ट्राईक -राहुल गांधी

राजस्थान, 01 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकसारखीच मनोहन सिंग यांच्याकाळात तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक झाल्या होत्या. याची तुम्हाला माहिती होती का? असं सांगत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींनी लष्कराच्या सामर्थ्याचा राजकीय वापर केला असा आरोप केला आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीत प्रचारात राहुल गांधी यांनी तरुण आणि उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी जीएसटी, नोटबंदी, हेल्थ केअर, सर्जिकल स्ट्राईक आणि महिला अत्याचारावरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायद्यासाठी वापर केला. मोदींनी सैन्याच्या अधिकार क्षेत्रात घुसून त्यांच्या सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायद्यासाठी बदल केला. मुळात हा सैन्याचा निर्णय होता

पण उत्तरप्रदेश निवडणुकीत पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी  सर्जिकल स्ट्राईकचा वापर केला असा आरोप राहुल गांधींनी केला.

मनमोहन सिंग यांच्या काळातही ३ वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले होते. हे तुम्हाला माहिती आहे का ?  जेव्हा लष्कर मनमोहन सिंग यांच्याकडे पाकिस्तानला प्रत्युत्तरासाठीच्या कारवाईबद्दल माहिती घेऊन आले त्यावेळी त्यांनी ही प्रक्रिया गुप्त ठेवावी लागेल असं सांगितलं असं राहुल गांधींनी सांगितलं.

Loading...

नोटबंदी हा मोठा घोटाळा आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे लघुउद्योजकांचं  कंबरडं मोडलं. त्यामुळे मोठ्या उद्योजकांचा मार्ग मोकळा झाला. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची जनता अजूनही संभ्रम आहे अशी टीकाही राहुल गांधींनी केली.

===========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2018 05:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...