मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Life @ 25 : मोबाईल फोनमध्ये अनेक प्रकारचे डिस्प्ले वापरले जातात, त्यापैकी कोणता बेस्ट?

Life @ 25 : मोबाईल फोनमध्ये अनेक प्रकारचे डिस्प्ले वापरले जातात, त्यापैकी कोणता बेस्ट?

कोणत्या डिस्प्लेचा फोन घ्यायचा? कोणता डिस्प्ले आपल्या डोळ्यांसाठी चांगला आणि त्याचा फायदा काय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

कोणत्या डिस्प्लेचा फोन घ्यायचा? कोणता डिस्प्ले आपल्या डोळ्यांसाठी चांगला आणि त्याचा फायदा काय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

कोणत्या डिस्प्लेचा फोन घ्यायचा? कोणता डिस्प्ले आपल्या डोळ्यांसाठी चांगला आणि त्याचा फायदा काय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई : आपण फोन घेताना बऱ्याच गोष्टी बघतो. त्यामध्ये डिस्प्ले देखील असतो. पण तुम्हाला माहिती आहे का? डिस्प्लेचे वेगवेगळे प्रकार आहेत. या पैकी कोणत्या डिस्प्लेचा फोन घ्यायचा? कोणता डिस्प्ले आपल्या डोळ्यांसाठी चांगला आणि त्याचा फायदा काय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या डोळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपल्याला योग्य डिस्प्लेचा फोन घेणं गरजेचं आहे. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे फोन आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे डिस्प्ले पाहायला मिळतात. प्रत्येक डिस्प्लेचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य असते. कोणता डिस्प्ले चांगला आहे आणि कोणता नाही हे कसे शोधायचा याबद्दल आज जाणून घेणार आहोत. LCD (लिक्विड क्रिस्टल डिस्‍प्‍ले) आणि LED (लाइट इमिटिंग डायोड) आणि रेटिना अशा तीन प्रकारात वर्गीकरण केलं जातं. LCD : यामध्ये बॅग्राऊंडमध्ये लाईट असते. असे फोन वापरणं थोडं जोखमीचं असतं. कारण याचा डिस्प्ले जास्त त्रास देऊ शकतो. मोबाईलसाठी TFT LCD Panel , IPS LCD Panel आणि SLCD Panel अशा वेगवेगळ्या क्वालिटीचे डिस्प्ले वापरले जातात. TFT LCD पॅनल : हा डिस्प्ले खूप जास्त स्वस्त मिळतो असं म्हटलं जातं. यामध्ये पिक्सल एक कॅपेसिटर आणि ट्रान्जिस्टरशी जोडलेला असतो. हाय कॉन्ट्रास्ट रेशो असलेली चित्र पाहायला मिळतात. आईपीएस हा सगळ्यात चांगला डिस्प्ले मानला जातो. कारण यामध्ये रंग चांगले दिसतात. SLCD पॅनल- आईपीएस एलसीडी डिस्प्लेमध्ये बाहेरचा ग्लास आणि टच सेन्सर यामध्ये एक गॅप असतो. मात्र या डिस्प्लेमध्ये कोणताही गॅप नसतो. ते एकमेकांना जोडलेले असतात. LED डिस्प्प्ले एलसीडी डिस्प्लेमध्ये आपण सीसीएफएल वापरतो. एलईडी डिस्प्लेमध्ये बॅक लाईट म्हणून एलसीडी ब्लेब वापरतो. मोबाईलमध्ये साधारणपणे दोन प्रकारचे एलईडी स्क्रीन वापरले जातात: AMOLED (Active-Matrix Organic Light Emitting Diode) ही टेक्नोलॉजी सॅमसंगने बाजारपेठेत आणली आहे. AMOLED डिस्प्लेमध्ये, पिक्सेल स्वतः एलईडी बल्ब म्हणून कार्य करतो, ज्यामुळे त्याला बॅकलाइटिंगची आवश्यकता नसते. या तंत्रज्ञानामुळे विजेची बचत होण्यास मदत होते. फोनमध्ये आहे तसाच फोटो किंवा व्हिडीओ येतो. म्हणजे जर अंधार असेल तर अंधार येईल. अंधारात कमी लाईटमध्ये फोटो काढला तर तो तसाच दिसेल. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. OLED Display हे तंत्रज्ञान एलजीचे असून एलजीने त्याचे पेटंटही घेतलं आहे. हा डिस्प्ले AMOLED सारखाच आहे. OLED मध्ये दोन कंडक्टरमधील पातळ फिल्म्सची सीरिज असते, ज्यामधून करंट पास झाला की लाइट इमिट होते. ही टेक्नोलॉजी महागड्या मोबाईलमध्ये वापरण्यात आल्याचं सांगितलं जातं. Retina Display रेटीना डिस्प्ले ऐपल कंपनी का ट्रेडमार्क है. ऐपल ने IPS LCD डिस्पले का संशोधन किया और इसे रेटिना डिस्प्ले में बदल दिया. रेटिना डिस्प्ले में हम आईपीएस एलसीडी डिस्पले की तुलना में अधिक PPI (Pixel Per Inch) देख सकते हैं. रेटीना डिस्पले ऐपल के मोबाइल फोन में आते हैं. कौन सा डिस्प्ले है बेहतर ? जाहिर है AMOLED और OLED दुनिया में सबसे अच्छे डिस्प्ले हैं. AMOLED और OLED में अच्छी क्वालिटी के साथ बेहतर कलर रिप्रोडक्शन, धूप में बेहतर विजिबिलिटी, ट्रू ब्लैक कल, अनलिमिटेड, एक्सपेक्ट रेश्यो, बेहतर व्यूइंग एंगल, बेहतर कंट्रास्ट और बेहतर बैटरी बैकअप मिलता है. कोणता डिस्प्ले सगळ्यात बेस्ट? AMOLED आणि OLED हे जगातील सर्वोत्तम डिस्प्ले आहेत. AMOLED आणि OLED चांगली क्वालिटी आणि फोटो किंवा व्हिडीओमधील चांगले रंग कॅप्चर करतो. उन्हामध्ये चांगली व्हिजिबलिटी देखील मिळते. नॅचरल कलर आणि कॉन्ट्रास्ट कलर उत्तम बॅटरी बॅकअप देखील देतात. त्यामुळे ज्या फोनमध्ये हे दोन डिस्प्ले आहेत तेच फोन सर्वोत्तम असल्याचं दावा काही तज्ज्ञांनी केला आहे.
First published:

Tags: Digital prime time, Technology

पुढील बातम्या