गडचिरोली, 08 ऑगस्ट: मागील 5 दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अल्पवयीन प्रेमीयुगालाचा (Couple) गडचिरोली (Gadchiroli) तालुक्यातील आरमोरी तालुक्यातील शिवनी घाटावर मृतदेह (Dead body) आढळला आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली आहे. दोघांनीही एकमेकांच्या हातात दोरी बांधून गडचिरोली येथील वैनगंगा नदीत उडी घेतली (Suicide by Jumping into River) होती, त्यामुळे हाताला दोरी बांधलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळले आहेत. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित अल्पवयीन मुला-मुलीनं प्रेमप्रकरणातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, स्वाती दिलीप मेश्राम (वय -15) आणि आशिष प्रभू मेश्राम (वय- 17) असं आत्महत्या करण्याऱ्या अल्पवयीन मुला-मुलीचं नाव आहे. संबंधित दोघंही जण चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील चिंचोली बुजुर्ग येथील रहिवासी आहेत. संबंधित दोघांनी प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. तूर्तास पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली असून घटनेचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा-वडिलांच्या उपचारासाठी मुलाचं गुन्हेगारी पाऊल; मंदिरात दानपेटीवर डल्ला मारला पण..
मृत स्वाती आणि आशिष 3 ऑगस्टपासून बेपत्ता होते. याप्रकरणी दोघांच्याही कुटुंबीयांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घेत, तातडीनं शोधमोहीम राबवली होती. पण दोघांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. तरीही पोलीस सातत्यानं या अल्पवयीन प्रेमीयुगुलाचा शोध घेत होते. चार दिवस विविध ठिकाणी तपास करूनही दोघांबद्दल कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही.
हेही वाचा-...अन् तिला वाचवण्यासाठी सख्ख्या भावांनी लावली जीवाची बाजी; तिघांचा बुडून मृत्यू
दरम्यान काल शनिवारी स्वाती आणि आशिषचा मृतदेह आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर आढळला आहे. दोघांनी एकमेकांच्या हाताला दोरी बांधून वैनगंगा नदीत उडी घेतली असावी, त्यामुळे दोघांचे मृतदेह हाताला दोरी बांधलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. अशा अवस्थेत मृतदेह आढळल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gadchiroli, Suicide