खळबळजनक! विजेच्या धक्क्याने मावशी आणि भाचीचा एकमेकांच्या कुशीतच मृत्यू

खळबळजनक! विजेच्या धक्क्याने मावशी आणि भाचीचा एकमेकांच्या कुशीतच मृत्यू

घराच्या अंगणामध्ये कपडे वाळवण्यासाठी एक तार बांधलेली होती. या तारेमध्ये वायर कट होवून विद्युत प्रवाह उतरला होता. या तारेला हात लागल्याने रेणुकाला विजेचा धक्का बसला आणि ती खाली कोसळली.

  • Share this:

बीड, 07 नोव्हेंबर : विजेचा धक्का लागल्याने मावशीसह भाचीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात शिंदी इथे आज दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. यामध्ये एक महिला आणि एका लहान मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या दोघींमध्ये मावशी आणि भाचीचं नातं असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. तर एकाच क्षणी दोघांचा अशा प्रकारे जीव गेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रेणुका अशोक थोरात (वय 20, हमु.शिंदी, रा.खंडेश्वरी ता.कळंब जि.उस्मानाबाद)आणि अश्विनी भागवत जोगदंड (वय 15, रा.लोणगाव ता.माजलगाव जि.बीड) अशी मयत मावशी आणि भाचीची नावं आहेत. रेणुका थोरात ही विवाहित असून ती माहेरी आली होती. घराच्या अंगणामध्ये कपडे वाळवण्यासाठी एक तार बांधलेली होती. या तारेमध्ये वायर कट होवून विद्युत प्रवाह उतरला होता. या तारेला हात लागल्याने रेणुकाला विजेचा धक्का बसला आणि ती खाली कोसळली.

मावशीला खाली पडलेलं पाहून अश्विनी बाजुला असलेली त्यांच्या बहिणीची मुलगी अश्विनी धावत आली आणि तिला पकडलं. यात दोघींचाही विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. घरच्यांना या सगळ्याची माहिती मिळताच त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.

घरातील तरुण महिलांना अशा प्रकारे गमावल्यामुळे संपूर्ण घरावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर पोलिसांतही या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी दोघींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून विद्यूत प्रवाह असलेल्या तार खुल्या कशा राहिल्या याचा तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 09:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading