अनैतिक संबंधातून 2 मजूर महिलांची निर्घृण हत्या, असा झाला प्रकरणाचा उलगडा

अनैतिक संबंधातून 2 मजूर महिलांची निर्घृण हत्या, असा झाला प्रकरणाचा उलगडा

महिलांना पिकांच्या चोरीची सवय होती....

  • Share this:

इम्तियाज अहमद(प्रतिनिधी)

रावेर,21 नोव्हेंबर: एक नव्हे अनेकांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून रावेर तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द येथे 2 मजूर महिलांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी अवघ्या 12 तासांत पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. कैलास गाढे, लक्ष्मण निकम अशी दोन्ही आरोपींची नावे असून त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. आरोपी कैलास गाढे याने 50 वर्षीय मजूर महिलेच्या गळ्यावर चाकुचे वार केला तर याच वेळी तिच्यासोबत असलेल्या 55 वर्षीय दुसऱ्या मजूर महिलेवर लक्ष्मण निकम याने चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली.

काय आहे हे प्रकरण?

रावेर तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द येथील 2 मजूर महिला सोमवारी (18 नोव्हेंबर) सकाळी चारा आणण्यासाठी जातो, असे सांगून घरून गेल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्या घरी परतल्या नाही. मंगळवारी (19 नोव्हेंबर) दुपारी खेडी शिवारात असलेल्या कपाशी व तुरीच्या शेतात दोन्ही महिलांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी मंगळवारी पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

अनेक वर्षांपासून होते अनैतिक संबंध...

मिळालेली माहिती अशी की, एका महिलेचे आरोपी कैलास गाढे याच्यासोबत अनेक वर्षापासून तर दुसऱ्या महिलेचे लक्ष्मण निकमशी वर्षभरापासून अनैतिक संबंध होते. या दोन्ही मैत्रिणी होत्या. या महिलांना पिकांच्या चोरीची सवय होती. मात्र, गाढेला अशी चोरी केल्याचे आवडत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात कायम वाद होत होता.

दोन्ही महिलांचा काटा काढायचा म्हणून गाढे आणि निकम याने निर्धार केला. सोमवारी दुपारी खेडी शिवारात गाढे व निकम हे दोघे त्या महिला शेताकडे गेले. जातांना आरोपींनी चाकू सोबत नेले होते. तिथे भेटीनंतर गाढेने संशयावरून वाद घातला आणि सोबत आणलेल्या चाकूने गळ्यावर वार केला. दुसरी महिला या हत्येचा बोभाटा करेल म्हणून थोड्या अंतरावर निकमने तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली.

पोलिसांनी मिळाला तपासाचा धागा...

दोन्ही महिलांची हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तपासातून त्यांना अनैतिक संबंधाबाबतचा धागा मिळाला. त्याआधी पोलिसांनी शेतमालक नारायण सोनावणे यांच्यासह त्यांच्या नोकरांना तसेच दुसरे शेतमालक नारायण पाटील त्यांचे भाऊ गाढे आणि निकम अशा 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी गाढे आणि निकम या दोघांनी गुन्हा कबूल केला.

First published: November 21, 2019, 10:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading