• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • Lockdown नंतर पर्यटनासाठी आलेल्या दोन महिलांचा मृत्यू; River Rafting ची हौस भोवली

Lockdown नंतर पर्यटनासाठी आलेल्या दोन महिलांचा मृत्यू; River Rafting ची हौस भोवली

River rafting करताना काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा ते जिवावर बेतू शकतं.

 • Share this:
  जम्मू-काश्मीर, 29 ऑक्टोबर : कुल्लू जिल्ह्याच्या (Kullu News) मुख्यालयापासून सहा किलोमीटर लांब बाशिंगच्या जवळील व्यास नदीत एक राफ्ट पलटल्यामुळे (Raft overturned) दोन महिला पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. याशिवाय राफ्टमधील अन्य पर्यटक महिलादेखील जखमी झाल्या आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे. (Two women died when the raft overturned while river rafting) मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लू-मनालीला फिरण्यासाठी मध्य प्रदेश आणि मुंबईतून महिलांची टीम बबेली स्थित राफ्टिंग साइटवर आली होती. दुपारनंतर बाशिंगमधील छुरूडूजवळ महिला पर्यटकांनी भरलेली राफ्ट अनियंत्रित होऊन नदीत पलटली आणि व्यास नदीत वाहून गेली. राफ्ट पलटल्यानंतर रेस्क्यू टीमने महिलांना पाण्यातून बाहेर काढलं आणि कुल्लू रुग्णालयात पाठवलं. हे ही वाचा-मुलीची छेड काढणाऱ्या live in पार्टनरला आईने पेट्रोल टाकून जिवंत जाळलं यापैकी दोन महिला पर्यंटकांची तब्येत अधिक बिघडली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत महिलांची ओळख मुंबईतील दाहोद वाला (75) आणि मध्य प्रदेशातील साकेरा बॉम्बे वाला (53) याचा मृत्यू झाला. जखमींपैकी एक महिलेची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगितलं जात आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: