रेल्वे फाटकात दुचाकीस्वार अडकले अन् काही इंचावरून गेली भरधाव मालगाडी !

रेल्वे फाटकात दुचाकीस्वार अडकले अन् काही इंचावरून गेली भरधाव मालगाडी !

ठाकुर्ली रेल्वे स्टेशनमधलं रेल्वेचं गेट बंद असताना काही दुचाकीस्वार फाटकापलीकडे अडकले होते. त्याचवेळी त्यांच्या अगदी काही इंचानवरून एक मालगाडी भरधाव वेगाने गेली.

  • Share this:

21 नोव्हेंबर : 'रेल्वे क्रॉसिंगवर गेट बंद झाल्यावर रुळ ओलांडू नका' अशी वारंवार सुचना रेल्वेकडून दिली जाते. पण तरीही जीव धोक्यात घालून काही महाभाग गेट खालून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करतात आणि अडकतात. मुंबईत ठाकुर्ली स्टेशनजवळ काही दुचाकीस्वार गेटच्या आत अडकले आणि भरधाव मालगाडी अवघ्या काही इंचावर गेल्याचा अंगाचा थरकाप उडवणार व्हिडिओ व्हायरल झालाय.

मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकातला एक व्हिडिओ सध्या डोंबिवलीत व्हायरल झालाय. ठाकुर्ली रेल्वे स्टेशनमधलं रेल्वेचं गेट बंद असताना काही दुचाकीस्वार फाटकापलीकडे अडकले होते. त्याचवेळी त्यांच्या अगदी काही इंचानवरून एक मालगाडी भरधाव वेगाने गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रेल्वे गेट काही सेकंद उशिराने बंद झालं आणि त्यातून निघण्याचा प्रयत्न करत असताना हे वाहनचालक पलीकडच्या बाजूला अडकून पडले. या रेल्वे क्रॉसिंगवर असे प्रकार नेहमीचेच असून रेल्वेच्या वतीने इथं सुरक्षारक्षक तैनात नाही. त्यामुळे इथं मोठा अपघात घडण्याची भीती इथले स्थानिक व्यक्त करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 07:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading