बालपणाच्या मैत्रीवर अपघाताने घातला घाला, 3 मित्रांचा जागीच मृत्यू

बालपणाच्या मैत्रीवर अपघाताने घातला घाला, 3 मित्रांचा जागीच मृत्यू

दुचाकीवर जाणाऱ्या 3 मित्रांना टाटा पिकपने धडक दिली आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Share this:

गोंदिया, 22 ऑक्टोबर : गोंदियामध्ये एका रोड अपघातात 3 तरुणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी  इथल्या बस स्थानकासमोर सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीवर जाणाऱ्या 3 मित्रांना टाटा पिकपने धडक दिली आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

टाटा एस पिकप आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात 3 मित्रांनी जागीच जीव गमावला. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गांगलवाडी तहसील आरमोरी जिल्हा गडचिरोली इथले हे तीन तरुण असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल होत संपूर्ण अपघाताचा तपास करत आहेत.

इतर बातम्या - मजुराचं शारीरिक शोषण करायचा मालक, धारदार शस्त्रानं शरीराचे केले 3 तुकडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेजण दुचाकीने जात असताना समोर येणाऱ्या पिकअपचा आणि गाडीचा भीषण अपघात झाला. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 3 तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, अपघातात मृत झालेल्या तरुणांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिकांकडून करण्यात येत आहेत. तर अपघात नेमका कसा झाला याबद्दल पोलीस स्थानिकांशी चौकशी करणार असल्याची माहिती आहे. तरुण मुलांना अशा प्रकारे अपघातात गमावल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या - प्रदीप शर्मांना टक्कर देणाऱ्या हितेंद्र ठाकुरांनी जाहीर केला मोठा निर्णय

Published by: Renuka Dhaybar
First published: October 22, 2019, 4:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading