S M L

खड्ड्यात आदळून पती-पत्नी बाजूला पडले, मागच्या गाडीने 2 मुलांना चिरडलं

नाशिक महामार्गावर खड्यांमुळे एका दुचाकीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन मुले ठार झाले तर आई-वडील जखमी झाले आहेत.

Updated On: Aug 27, 2018 09:07 AM IST

खड्ड्यात आदळून पती-पत्नी बाजूला पडले, मागच्या गाडीने 2 मुलांना चिरडलं

शहापूर, 27 ऑगस्ट : नाशिक महामार्गावर खड्यांमुळे एका दुचाकीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन मुले ठार झाले तर आई-वडील जखमी झाले आहेत. नाशिक महामार्गावर असलेली गर्दी आणि त्यात रस्त्यावरचे खड्डे यांमुळे दोघांचा जीव गेला आहे. शहापूर तालुक्यातील अवरे या गावातील प्रकाश बरकू घरत हा आपल्या पत्नी सोबत दोन मुलांना घेऊन मुंबई-नाशिक महामार्गावरून दुचाकीवरून चालला होता. त्यावेळी खड्ड्यांमुळे त्याच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांनी त्यांच्या 2 मुलांना गमावलं आहे.

मुंबई नाशिक- महामार्गावर पडलेले खड्डे चुकवत असताना प्रकाश घरत यांची बाईक एका मोठ्या खड्यात आदळून पडली. गाडी जोरात आदळल्याने घरत आणि त्यांची पत्नी रस्त्याच्या बाजूला पडले त्यामुळे त्यांचा जीव वाचला पण गाडीवर बसलेली दोन मुलं रस्त्याच्या मध्येच पडली आणि त्यांच्या पाठीमागे येणारी गाडी थेट त्या मुलांच्या अंगावरून गेली. या भीषण अपघातात घरात यांनी आपल्या दोन मुलांना जागीच गमावलं आहे.

या अपघातात दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला असून पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झालेला पाहताच इतर प्रवाश्यांनी गाडी थांबवून तात्काळ घरत यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून मुलांना उडवणारी ती गाडी कोणती होती याचा आता पोलीस तपास करत आहेत. पण आपल्या घरातल्या दोन हसत्याखेळत्या मुलांना असं अपघातात गमावल्याने घरत कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

 

Loading...
Loading...

फाटलेल्या नोटा बदलण्याचा सोपा उपाय, 'RBI'ने सांगितले हे चार नियम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2018 09:07 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close