फलटण, 16 जुलै : ज्ञानेश्वर माऊलींच्या फलटणच्या पालखी तळावर मोठी दुर्घटना घडली आहे. तीन वारकऱ्यांना विद्युतवाहक तारेचा शॉक लागला आहे. यातील दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर एक वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. ज्ञानोबा चोपडे आणि जाईबाई जामके असं या दोन मृत वारकऱ्यांचं नाव आहे. विद्युतवाहक तारेला स्पर्श झाल्याने त्या दोघांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.
ज्ञानोबा चोपडे यांचं वय 65 आहे. ते रा. समतापूर ता. जि. परभणीचे आहेत आणि जाईबाई जामके वय 60 रा. शिवणी जि. नांदेडच्या राहणाऱ्या आहेत. जखमी कमलाबाई लोखंडे वय 65 रा. सासफळ जि. परभणीच्या राहणाऱ्या आहेत.
हेही वाचा...
...तर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंवर एफआयआर करेन - संजय निरुपम
'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा