अल्पवयीन मुलींवर केली प्रेमाची जादू, दळणासाठी गेल्या असता दोघींचं अपहरण

अल्पवयीन मुलींवर केली प्रेमाची जादू, दळणासाठी गेल्या असता दोघींचं अपहरण

कामतघर परिसरातील फेणे इथं दोन 12वर्षीय मुली घरातून गव्हाचं दळण दळण्यासाठी गेल्या असता त्या पुन्हा घरी आल्याचं नाही.

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 18 एप्रिल : भिवंडी शहरामध्ये अपहरणाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. पुन्हा एकदा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामतघर परिसरातील फेणे इथं दोन 12वर्षीय मुली घरातून गव्हाचं दळण दळण्यासाठी गेल्या असता त्या पुन्हा घरी आल्याचं नाही. त्यामुळे त्यांच्या पालकांनी भिवंडी तसंच कल्याण रेल्व स्टेशन सह सर्वत्र शोध घेतला मात्र त्यांचा कुठेच शोध लागला नाही.

या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दळण आणण्यासाठी दोघी बहिणी गेल्या असता त्यांचं अपहरण करण्य़ात आलं. दरम्यान, मुलींच्या चाळीच्या पाठीमागे  राहणाऱ्या झिनुआ बिंद आणि अजय कसबे हे दोघेही परिसरात दिसून आले नाही. तसंच त्यांचे मोबाईल बंद असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर संशय व्यक्त करत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : चहाच्या टपरीवर सुरू होत्या निवडणुकांच्या गप्पा, गोळीबार करून क्षणात दोघांची हत्या

या दोघांनी आपापसात संगनमत करून त्या दोघींना फूस लावली. त्यांच्या बालमनाचा फायदा घेऊन त्यांच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून त्यांचं अपहरण केल्याचा गुन्हा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस आता घटनेचा कसून तपास करत आहेत.

आपल्या दोन मुंलींचं अपहरण झाल्यामुळे पालकांना मोठा धक्का बसला आहे. तर परिसरात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. अधिक तपासासाठी पोलीस मुलींच्या कुटुंबीयांची चौकशी करणार आहेत. तर प्रत्यक्षदर्शींचीदेखील यामध्ये चौकशी करण्यात येत आहे.

भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पालकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी प्रशासनाने जनजागृती करणं गरजेचं आहे असं स्थळी नागरिकांचं म्हणणं आहे.

VIDEO : पुलवामा हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंचा गंभीर आरोप

First published: April 18, 2019, 10:29 AM IST

ताज्या बातम्या