दोन ट्रकचा आमनेसामने भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

दोन ट्रकचा आमनेसामने भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

या भीषण अपघात चार लोकांना मृत्यू झाला असून काही काळ माहामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

  • Share this:

बब्बू शेख, प्रतिनिधी

गोंदिया, 01 डिसेंबर : गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर आज सकाळी दोन ट्रकची आमनेसामने टक्कर झाली आणि या भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघात चार लोकांना मृत्यू झाला असून काही काळ माहामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

नागपूरच्या दिशेने येणाऱ्या आणि रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रक चालकांची आज पहाटे ६ वाजे दरम्यान आपसात भीषण धडक झाली. रायपूरच्या ट्रकमध्ये असलेल्या ट्रक चालक आणि २ क्लिनरचा तर नागपूरच्या दिशेने येणाऱ्या गुजरातमधील क्लिनरचा मृत्यू झाला आहे.

तर ट्रक चालक जखमी असून त्याच्यावर देवरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतकामध्ये ३० वर्षीय चालक रवी यादव माहूरकला राजदंगाव तर दुसरा गुजरात येथील २८ वर्षीय क्लिनर जावेद हाला अशी यांची ओळख पटली आहे. तीन लोकांची ओळख अद्याप पटू शकली नसून देवरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून चौघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तर ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पण पोलिसांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला काढल्यानंतर वाहतूक आता सुरळीत झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात दोन्ही ट्रकचा चुरा झाला आहे.

काचेच्या प्लेट उचलून ठेवताना पडल्या अंगावर, श्वास रोखायला लावणार CCTV

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2018 11:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading