पाकचं घृणास्पद कृत्य, भारताच्या दोन शहीद जवानांची विटंबना

सीमारेषेवर शहीद झालेल्या दोन जवानांच्या पार्थिवांची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 1, 2017 04:20 PM IST

पाकचं घृणास्पद कृत्य, भारताच्या दोन शहीद जवानांची विटंबना

1 मे : एकीकडे पाकिस्तानाच्या कुरापत्या आणि दुसरीकडे पाकिस्तानी सैनिकांचा उच्छाद सुरूच आहे. सीमारेषेवर शहीद झालेल्या दोन जवानांच्या पार्थिवांची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडलीये.

पाकिस्तानकडून पुँछ सेक्टरमधील मेंडरमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले होते. नायब सुभेदार परमजीत सिंग, बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर असं या शहीद जवानांचं नाव आहे. या गोळीबारानंतर पाकिस्तानच्या BAT अर्थात बॉर्डर अॅक्शन टीमने या दोन्ही जवानांच्या पार्थिवांशी विटंबना करण्याचं लज्जास्पद कृत्य केलं. पाकच्या या कृत्यानंतर भारतीय सैन्याने या कृत्याचं उत्तर दिलं जाईल असा इशारा दिलाय.

राजनाथ सिंह यांनी बोलावली बैठक

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी तातडीने आपात्कालीन बैठक  बोलावली आहे. या बैठकीत काश्मीर आणि सुकमामध्ये झालेल्या घटनांवर चर्चा होणार आहे. या बैठकीला गृहसचिव, सीआयपीएफ डीजी, आयबी चीफ आणि एनएसए हजर राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2017 04:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...