शाळेची सुट्टी ठरली अखेरची, पोहोण्यासाठी गेलेल्या 2 लहान मुलांचा बुडून मृत्यू

शाळेची सुट्टी ठरली अखेरची, पोहोण्यासाठी गेलेल्या 2 लहान मुलांचा बुडून मृत्यू

मुसळधार पावसामुळे सगळी तलावं आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे या चिमुकल्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

बाळासाहेब काळे, पुरंदर

जेजुरी, 07 जुलै : जेजुरीतील पेशवे तलावातील खड्ड्यात दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे सगळी तलावं आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे या चिमुकल्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी सकाळी 11 वाजता आदर्श मनोहर उबाळे, (वय 7 वर्षे) आणि आदित्य संभाजी कोळी (वय 9 वर्षे) हे दोघेजण रविवारची सुट्टी असल्याने पोहायला गेले होते. नुकतीच पावसाला सुरुवात झालेली असल्याने तलावातील खड्ड्यात पाणी साचलेलं होतं. मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दोन्ही मुलं बुडाली.

दुपारी 3 वाजले तरी मुलं घरी आली नाहीत म्हणून नातेवाईकांनी सर्वत्र शोधा-शोध केली असता या खड्ड्याचा काठावर त्यांची कपडे आढळून आली. पोहणाऱ्या तरुणांनी खड्ड्यात उतरून मुलांचे मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनानंतर मुलांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

दुर्दैव म्हणजे ही दोन्ही मुले आई-वडिलांना एकुलती एक होती. पेशवे तलाव अनेक वर्षांपासून कोरडा राहिल्याने तलावातून मुरूमाचे बेकायदेशीर उत्खनन होत असल्यानं तलावात मोठ-मोठे खड्डे झालेले आहेत. मुले बुडालेल्या खड्ड्याची खोली 15 फुटांपेक्षा जास्त होती. त्यामुळे त्यांना पोहता आलं नाही आणि त्यात त्यांनी त्यांचे प्राण गमावले.

दरम्यान, पावसामुळे सगळी मंडळी विकेंडला फिरण्यासाठी बाहेर निघतात. पण अशावेळी आपली काळजी घेणं महत्त्वाचं आहे. समुद्रकिनारी किंवा तलावात पोहण्याआधी पाण्य़ाचा अंदाज घ्या. मोठ-मोठ्या धबधब्यांवर जाऊ नका.

VIDEO: भाजपात प्रवेश करण्यासाठी विचार करण्याची गरज नाही- सपना चौधरी

First published: July 7, 2019, 7:01 PM IST
Tags: pune story

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading