आणि दोघींचाही सुटला हात, पोहण्यासाठी गेलेल्या 2 बहिणींचा बुडून मृत्यू

लहान बहिणीला पोहता येत नसतानाही तिने पाण्यात उडी घेतली तिला वाचवण्यासाठी मोठ्या बहिणीने पाण्यात उडी घेतली. पण....

News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2019 06:02 PM IST

आणि दोघींचाही सुटला हात, पोहण्यासाठी गेलेल्या 2 बहिणींचा बुडून मृत्यू

इंदापूर, 25 फेब्रुवारी : इंदापूर तालुक्यात अतिशय दु:खद घटना घडली आहे. शहा गावातील दोघी बहीणींचा भिमा नदी पात्रात पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. लहान बहिणीला पोहता येत नसतानाही तिने पाण्यात उडी घेतली तिला वाचवण्यासाठी मोठ्या बहिणीने पाण्यात उडी घेतली. पण यात दोघींचाही मृत्यू झाला आहे.

शहा गावातील पूजा अशोक काळे, वय १० वर्ष  तर तिची मोठी बहीण सारिका अशोक काळे, वय वर्षे १२ या दोघी काल दुपारी 3 च्या दरम्यान शहा गावच्या नदीच्या खो-यात पोहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र पूजाला पोहता येत नसल्यानं सारिका तिला वाचवण्यासाठी धावली मात्र अखेर दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या दोघींसोबत असणारा बाळू चांगदेव काळे यानं हा प्रकार पाहिला आणि तो वस्तीवर धावत आला. त्यानंतर मुलींचे वडील अशोक मोहन काळे यांच्यासह अनेक जण मुलींच्या मदतीसाठी धावले. मात्र वेळ निघून गेली होती.

पाण्यात पुजा आणि सारिकाचा शोध घेण्यास सुरुवात केली असता अखेर पुजाचा मृतदेह हाती लागला. तर बेपत्ता असणाऱ्या सारिकाचा शोध सुरू होता. मृतदेह सापडत नसल्याने अखेर प्रशासनास पाणबुडीची मदत घ्यावी लागली.

आज दुपारी १ वाजता सारिकाचा मृतदेह प्रशासनाच्या हाती लागला. सध्या पूजा आणि सारिका दोघींचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पण या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading...

आपल्या घरातल्या हसत्या-खेळत्या मुलींना अशा पद्धतीने गमावल्यामुळे संपूर्ण काळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरातून मुलींच्या जाण्यावर शोककळा व्यक्त करण्यात येत आहे.


VIDEO: ..जेव्हा स्वत: काढलेल्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाला राज ठाकरे भेट देतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 06:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...