रस्ता ओलांडताना ट्रकने उडवलं, हातात हात धरूनच 2 बहिणींचं आयुष्य संपलं

रस्ता ओलांडताना ट्रकने उडवलं, हातात हात धरूनच 2 बहिणींचं आयुष्य संपलं

पुलाचं काम सुरू असल्यामुळे वाहनांना ये-जा करण्यासाठी अडचण होते. त्यातच भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकमुळे यापुर्वीही असे अपघात झाले आहेत.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

नागपूर, 15 मे : नागपूरच्या पारडी बाजार चौकात झालेल्या अपघातामध्ये 2 बहिणींनी जीव गमवला आहे. ट्रकने चिरडल्यामुळे झालेल्या अपघातात दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. सकाळी दुध आणण्यासाठी गेलेल्या बहिणींचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळी रस्ता ओलांडतांना ट्रकने दोन सख्ख्या बहिणींना चिरडलं. दोघी बहिणी पारडी परिसरात सकाळी दुध आणायला जात होत्या. परिसरातील नागपूर भंडारा हायवेवर हा अपघात झाला. परिसरात पुलाचं काम सुरू असल्यामुळे वाहनांना ये-जा करण्यासाठी अडचण होते. त्यातच भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकमुळे यापुर्वीही असे अपघात झाले आहेत.

रस्ता ओलांडताना भरधाव वेगात असलेल्या ट्रक चालकाला आवरला नाही. त्यामध्ये त्याने दोन्ही मुलींना चिरडलं. या अपघातामध्ये दोघींचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात होताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.


हेही वाचा : सुरक्षा आहे कुठे? मुंबईच्या सरकारी रुग्णालयात महिलेवर बलात्कार

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलींचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता अपघाताचा अधिक तपास करत आहे.

अपघाताची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस स्थानिकांची चौकशी करणार आहेत. तर त्यासाठी परिसरातले सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येणार आहे. दरम्यान, घरातल्या तरुण बहिणींना अशा पद्धतीने गमावल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे तर संपूर्ण गावातून शोककळा व्यक्त होत आहे.

VIDEO : ...तर मी जिवंत परतलो नसतो, अमित शहांचा खळबजनक दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2019 01:07 PM IST

ताज्या बातम्या