जगात येण्याआधीच बाळाचं आयुष्य संपलं, गर्भवती महिलेने बलात्काराच्या जाचाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

जगात येण्याआधीच बाळाचं आयुष्य संपलं, गर्भवती महिलेने बलात्काराच्या जाचाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या धक्कादायक घटना समोर आल्या. देशात कुठेच महिला, तरुणी सुरक्षित नाही आहेत. त्यामुळे या घटनेमुळे पुन्हा एक देश हादरला.

  • Share this:

हिंगोली, 14 फेब्रुवारी : संपूर्ण राज्यात Valentines साजरा होत असताना हिंगोलीमध्ये मात्र महिला अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. दोन महिन्याच्या गर्भवती असलेल्या महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. या सगळ्या जाचाला कंटाळून महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या धक्कादायक घटना समोर आल्या. देशात कुठेच महिला, तरुणी सुरक्षित नाही आहेत. त्यामुळे या घटनेमुळे पुन्हा एक देश हादरला. गर्भवती महिलेवर अत्याचार करणाऱ्या तीन आरोपींवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत.

हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातील साखरा येथील ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी पीडित महिलेने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पतीच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आणि तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

दरम्यान, महिला 2 महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे यात एका बाळाचाही मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी घरातून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत.

इतर बातम्या - Valentines च्या निमित्ताने विद्यार्थीनींनी घेतली प्रेम विवाह न करण्याची शपथ

Valentine Day दिवशी धक्कादायक बातमी, हिंगणघाटसारख्या जळीतकांडाची तयारी करत होता आरोपी

आज प्रत्येकजण आपल्या प्रेमाची कबुली देऊन सगळ्यांना शुभेच्छा देत आहेत. अशात पालघरमध्ये आजच्या दिवशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालघरमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे हिंगणघाटसारखा  पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न टळला आहे.  लग्न मोडल्याचा राग मनात धरून पेट्रोल आणून मुलीच्या आईला व तिच्या लहान बहिणीला जाळण्याचा प्रयत्न पालघर पोलिसांनी हाणून पाडला आहे. हे दुष्कृत्य करण्याअगोदर पालघर पोलिसांनी गुरुवारी रात्री या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

इतर बातम्या - औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या दिलखुलास गप्पा; शरद पवार, उद्धव ठाकरेंवर म्हणाले...

भैरोसिंग राघूवीरसिंग राठोड (28) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यात पेट्रोल भरलेली बाटली आढळून आली. आरोपी  राजस्थान-अजमेर परिसरातील असून तो येथे हे दुष्कृत्य करण्यासाठी पालघर येथे आला होता अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या -रोहित पवारांचा 'Happy Valentines Day' मध्येही टोला, शेअर केलेल्या मेसेजची चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2020 01:48 PM IST

ताज्या बातम्या