• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • वाहत्या पाण्यातून दुचाकी काढणं आलं अंगलट; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

वाहत्या पाण्यातून दुचाकी काढणं आलं अंगलट; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Viral Video: पाण्याचा अंदाज न आल्यानं दुचाकीसह वाहत जाणाऱ्या दोन युवकांचे प्राण एका युवकानं वाचवला आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

 • Share this:
  परभणी, 14 जुलै: मागील दोन दिवसांत परभणी जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. अशातच दुथडी भरून वाहणाऱ्या फाल्गुनी नदीतून दुचाकी दुसऱ्या बाजूला नेणं दोघांच्या जीवावर बेतलं होतं. पण एका तरुणाच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला आहे. संबंधित घटना सोनपेठ तालुक्यातील शेळगाव जवळील उक्कडगाव रस्त्यावरील असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. मागील दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे फाल्गुनी नदीला पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहात आहे. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव जवळील उक्कडगाव रस्त्यावरील एका पुलावरून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्यानं आठ गावांचा  संपर्क देखील तुटला आहे. अशा अवस्थेत या पुलावरून वाहत्या पाण्यातून दुचाकी काढण्याचा प्रयत्न दोन जणांनी केला आहे. पण पाण्याच्या वेगाचा अंदाज अन आल्यानं दोघंही दुचाकीसह पुलाच्या मध्यभागी अडकले. हेही वाचा-छतावरून सरकत सरकत तो आला, पक्कड घेतली, आणि समोर पाहतो तर काय...!पाहा Viral Video पाण्याच्या वेगामुळे दोघंही दुचाकीसह वाहून जात होते. दरम्यान त्याठिकाणी असलेल्या एका युवकानं प्रसंगावधान दाखवत या दोघांचे प्राण वाचवले आहेत. पुलावरून दुचाकी घेऊन जात असताना, दुचाकी खड्ड्यात अडकली, त्यामुळे संबंधित दोघंही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागले. तेव्हा त्या ठिकाणी उपस्थिती असणाऱ्या काही तरुणांनी माणसांची साखळी करत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच दोघांसह दुचाकी देखील पाण्यातून बाहेर काढली आहे. हेही वाचा-पर्यटनस्थळी मान्सूनचं रौद्ररुप; ढगफुटी झाल्यानं वाहनं गेली वाहून, थरारक VIDEO दोघांना पाण्यातून बाहेर काढणाऱ्या तरुणाचं नाव वेदांत देशपांडे असं आहे. वेदांतच्या प्रसंगावधानामुळे वाहत जाणाऱ्या दोन व्यक्तींसह दुचाकी वाचली आहे. वेदांतच्या या धाडसाचं परीसरात कौतुक होत आहे. फाल्गुनी नदीवर पडलेले खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच पुलावरून पाणी वाहत असताना धोकादायक प्रवास न करण्याच आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
  Published by:News18 Desk
  First published: