कोल्हापुरात गव्याच्या हल्ल्यात शेतकरी आणि पत्रकाराचा मृत्यू

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 12, 2017 05:46 PM IST

कोल्हापुरात गव्याच्या हल्ल्यात शेतकरी आणि पत्रकाराचा मृत्यू

12 मे : कोल्हापूर जिल्ह्यात आज गव्याच्या हल्ल्यात 2 जण ठार झालेत. यामध्ये एका शेतकऱ्याचा समावेश असून स्थानिक वृत्त वाहिनीच्या पत्रकाराचाही समावेश आहे. भुदरगड तालुक्यातील आकुर्डे गावचा शेतकरी अनिल पवार आणि पत्रकार रघुनाथ शिंदे यांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय.

आज सकाळी आकुर्डे तालुका भुदरगड येथील भैरुचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारात उसाचा पाला काढताना अनिल पवार या तरुण शेतकऱ्यावर गव्याने हल्ला केला त्यात पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर या दुर्घटनेचे वार्तानकंन् करण्यासाठी गेलेले बी न्यूज़चे गारगोटी प्रतिनिधी रघुनाथ शिंदे त्याच गव्याच्या हल्यात गंभीर जखमी झाले.  त्यानंतर शिंदे यांना उपचारासाठी कोल्हापूर मध्ये दाखल केलं होतं पण उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पत्रकार शिंदे हे कॅमेरा घेऊन घटनास्थळी गेले होते. पण त्याचवेळी पाठीमागच्या बाजूने गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात गव्याचे शिंग त्यांच्या पोटात घुसल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. या घटनेनंतर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालय परिसरात माध्यमांमधल्या प्रतिनिधींनी आणि भुदरगडमधल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, या घटनेने आकुर्डे परिसरात भीतीचे वातावरण असून वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 03:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...