Home /News /news /

खळबळजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर दोघांनी केला कोयत्यानं हल्ला, गाड्याही फोडल्या

खळबळजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर दोघांनी केला कोयत्यानं हल्ला, गाड्याही फोडल्या

दोन्ही माथेफिरुंनी दुचाकीवरुन हातात कोयता घेऊन रस्त्यावर असलेल्या युवकांवर आणि महिलेवर कोयत्याने हल्ला केला.

    किरण मोहित, प्रतिनिधी सातारा, 12 जून : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन असलं तरी गुन्ह्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. आताही साताऱ्यामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा शहराजवळ असलेल्या खेड फाटा परिसरात दोन माथेफिरुंनी भरदिवसा दिसेल त्या नागरिकांवर, वाहनावर कोयत्याने हल्ला केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही माथेफिरुंनी दुचाकीवरुन हातात कोयता घेऊन रस्त्यावर असलेल्या युवकांवर आणि महिलेवर कोयत्याने हल्ला केला. यामधे युवक आणि महिला गांभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अचानक कोणीही येऊन चक्क कोयत्याने हल्ला करत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शेतकरी बापाला असा सलाम कोणीच केला नसेल, या फोटोमागच्या लेकीची कहाणी उर भरून आणेल स्थानिकांकडून हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर हल्लेखोर फरार झाले. यात पोलीस दोन्ही माथेफिरूंचा शोध घेत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. साताऱ्यात काही दिवसांपूर्वी तालुका पोलीस ठाण्यासमोरच कोयत्याने हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच अशा प्रकारचा हल्ला पुन्हा झाल्यानं गुन्हेगारांवर पोलिसांची वचक नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे? चांदीच्या किंमतीत या महिन्यातली सगळ्यात मोठी घसरण, काय आहे 10 ग्राम सोन्याचा भाव दरम्यान, संपूर्ण परिसरात आरोपींना शोधण्यासाठी पोलीस शोध घेत आहेत. पण या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर लवकरात लवकर या माथेफिरुंना ताब्यात घेणं महत्त्वाचं आहे. अथवा यामध्ये नागरिकांच्या जीवाला धोका आहे. 'धनंजय मुंडेंची दोनदा कोरोना चाचणी झाली पण...', राजेश टोपेंचा मोठा खुलासा
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या