भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात 200 - 300 दहशतवादी ठार?

भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात 200 - 300 दहशतवादी ठार?

बालाकोट या पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आता सुत्रांनी दिली आहे

  • Share this:

बालाकोट, 25 फेब्रुवारी : बालाकोट या पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आता सुत्रांनी दिली. 12 लढाऊ विमानांनी ही कारवाई केली. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं. एएनआयनं याबद्दलची माहिती दिली. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली.

भारतीय लढाऊ विमानांनी LoC पार करून पाकव्याप्त काश्मिरात प्रवेश केला आहे. भारताकडून 'जैश- ए- मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत अद्याप भारतीय वायूसेनेकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच वायूसेनेकडून याबाबत माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.

सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याचा विचार सुरू होता. त्याचाच एक भाग म्हणून भारताकडून हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर 14 फेब्रुवारीला हल्ला झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं केलेल्या या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले.

VIDEO : राज ठाकरे कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या भेटीला, म्हणाले, 'यांचा शाप लागेल सरकारला'

First published: February 26, 2019, 9:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading