मेरठ (उत्तर प्रदेश), 01 सप्टेंबर: चिमुकल्यांसाठी आईच्या कुशीत झोपणं ही सर्वात सुरक्षित जागा आहे असं म्हणतात. येणाऱ्या सर्व संकटांपासून संरक्षण देण्याचं काम आई करते. मात्र उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमध्ये (Meerut) घडलेल्या घटनेनं यावर काही प्रश्न उभे केले आहेत. दोन चिमुकल्या मुलींसोबत (2 girls are no more) घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या आईच्याही अंगाचा थरकाप उडाला आहे.
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये हे कुटुंब राहतं. काळ म्हणजेच मंगळवारी रात्री आई आणि तिच्या दोन मुली नेहमीप्रमाणे झोपी गेल्या. आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या मुलींना आणि आईला कल्पनाही नसेल की ही काळरात्र ठरणार आहे. बुधवारी पहाटे अचानक त्यांच्या खोली साप शिरला आहे त्यानं या दोन्ही चिमुकल्यांना दंश (Girls are no more due to snake bite) केला. मुली तडफडताना दिसताच आईचाही थरकाप उडाला.
या घटनेत एका मुलीचा जागूचीच मृत्यू झाला. तर दुसरीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी अनेक प्रयत्न करूनही तिला वाचवू शकले नाहीत. या घटनेनं संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
महाराष्ट्रातही (Maharashtra Crime News) सध्या सर्प दंशामुळे मृत्यूचं प्रमाण चांगलंच वाढलं आहे. निष्पाप जीवांना यामुळे आपला जीव गमवावा लागत आहे.
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.