मुजफ्फरपूर, 02 जून : प्रेमात खूप ताकद असते. खरं प्रेम कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी तयार असतं. याचच एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे. दोन मुली एकमेकांशी लग्न करण्याचा आग्रह धरत एसएसपी कार्यालयात पोहोचल्या. दोन मुलींना एकमेकींशी लग्न करायचं आहे हे पाहून सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. या सगळ्या प्रकारामुळे पोलीस स्टेशमनमध्ये गंभीर वातावरण पसरलं आहे.
पोलिसांनी शिकवला कायदा
दोन्ही मुलींना एकमेकांशी लग्न करायचं होतं पण नागरिकांनी त्यांना नकार दिला, म्हणून दोघी पोलिसांची परवानगी घेण्यासाठी गेल्या. मिळालेल्या माहितीनुसार, कुधनी पोलीस स्टेशन परिसरातील दोन मुली आपापसात लग्नाची तयारी करत होत्या. एका मुलीने दुसऱ्या मुलीचे केस कापले आणि तिला नवऱ्याच्या वेषात तयार केलं तर दुसरी मुलगी वधूच्या वेषात होती. पोलिसांनी लोकांची माहिती घेतली, तेव्हा दोघींनीही कायदा त्यांना परवानगी देतो असं सांगितलं.
तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा मुंबईत करोनाने मृत्यू, तब्बल 10 तास नाही मिळाला बेड
पोलिसांनी न्यायाचे दिले आश्वासन
खरंतर हे पाहून, कुधनी पोलिसही चकित झाले आणि मुलींच्या आग्रहावरून दोघींना एसएसपी कार्यालयात आणलं गेलं. तेथे अनेक बड्या अधिकाऱ्यांनी त्या दोघींची चौकशी केली. दोघीही अल्पवयीन असल्याचं दिसून आलं. परंतु त्या लग्न करण्याच्या हट्टावर कायम राहिल्या. महिलांच्या देखरेखीखाली दोघांनाही पोलीस ठाण्यात पाठवण्यात आलं आहे.
पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे, अतिवृष्टीसह 'निसर्ग' चक्रीवादळ घेणार रौद्र रुप
प्रतीक्षा आहे कायदेशीर प्रक्रियेची
महिला पोलीस स्टेशन त्यांचं वय पडताळत असून या प्रकरणी दोघांकडून चौकशी केली जात आहे. डीएसपी वेस्टर्न कृष्णा मुरारी प्रसाद म्हणाले की, सखोल तपासणीनंतर परवानगी असलेल्या कायद्यानुसार कारवाई केली जाईल. या विचित्र घटनेमुळे सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा बाजार उठला आहे.
पुणेकरांनी आता चिंता सोडावी, कोरोनासंदर्भात भाजपने घेतला मोठा निर्णय