Home /News /news /

घरातून बेपत्ता झालेल्या बहिणींनी एकमेकींसोबतच थाटला संसार; कुटुंबीय Shocked 

घरातून बेपत्ता झालेल्या बहिणींनी एकमेकींसोबतच थाटला संसार; कुटुंबीय Shocked 

सुरुवातीला तर दोघी बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

    नवी दिल्ली, 16 मे : दिल्लीला (New Delhi) लागून असलेल्या ग्रेटर नोएडामधील दनकोरमध्ये दोन बहिणींनी एकमेकींसोबत लग्न केल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. 20 एप्रिल रोजी ग्रेटर नोएडाच्या दनकोरमधून एक तरुणी बेपत्ता झाली होती. यानंतर तरुणीचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. मात्र ती कुठेच सापडली नाही. शेवटी कुटुंबीयांनी दनकोर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्याच दिवशी दिल्लीतूनही एक तरुणी गायब झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. तिच्याही कुटुंबीयांनी मुलही हरवल्याची तक्रार केली. बेपत्ता झालेल्या दोन्ही तरुणी या बहिणी आहेत. दोघीही गायब झाल्यामुळे कुटुंबीय खूप चिंतेत होते. दिल्लीआणि ग्रेट नोएडा दोन्हीकडील पोलीस त्यांचा शोध घेत होते. तर दुसरीकडे दोन्ही तरुणींनी दिल्लीतील एका मंदिरात लपून लग्न केल्याचं समोर आलं. हे ही वाचा- भावाचा मेहुण्याने 19 वर्षीय युवतीसोबत केले दुष्कर्म; वाचा, नेमकं काय घडलं? दोन्ही बहिणींनी एकमेकांसोबत केलं लग्न... दोन्ही बहिणी लग्नानंतर एक घर भाड्याने घेऊन दिल्लीत राहत होती. दनकोर पोलिसांनी बेपत्ता झालेल्या तरुणीला शोधून काढलं. त्या वेळी कळालं की, मुली मुलांच्या वेशात राहत होत्या. चौकशीत दोघींनी सांगितलं की, त्यांनी आपल्या मर्जीने लग्न केलं असून ते सोबत राहू इच्छितात. दोघींना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. कुटुंबीयांनी दोघींना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र दोघींनी एकमेकांसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. पोलिसांनी सांगितलं की, दोन्ही तरुणींची 18 वर्षे पूर्ण झाली असून त्या समलैंगिक आहेत. त्यांनी लग्नही केलं असून एकमेकांसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Delhi, Marriage

    पुढील बातम्या