रेल्वेच्या ट्रॅकवर बसून खेळत होते पब्जी, 2 मित्रांचा झाला जागीच मृत्यू

रेल्वेच्या ट्रॅकवर बसून खेळत होते पब्जी, 2 मित्रांचा झाला जागीच मृत्यू

पब्जी गेम खेळत असताना 2 मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे हे दोघेही मित्र रेल्वेच्या पटरीवर बसून पब्जी खेळत होते.

  • Share this:

हिंगोली, 16 मार्च : हिंगोलीमध्ये पब्जी गेम खेळताना मृत्यू झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पब्जी गेम खेळत असताना 2 मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे हे दोघेही मित्र रेल्वेच्या पटरीवर बसून पब्जी खेळत होते.

हिंगोली येथील खटकाळी बाय पास भागात शनिवार संध्याकाळी रेल्वे पटरीवर बसून दोन मित्र पब्जी गेम खेळत होते. गेम खेळताना हे दोघे इतके गेम मग्न झाले होते की त्यांना ट्रेन आलेलीदेखील समजलं नाही. यामध्ये नागेश गोरे आणि स्वप्निल अन्नपूर्वे अशा दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे.

संध्याकाळच्या सुमारास हे दोघे रेल्वेच्या पटरीवर पब्जी गेम खेळत होते. गेममध्ये हे दोघेही इतके रमले की त्यांना ट्रेन आल्याचंही भान नाही. आणि यात ते रेल्वेखाली आले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

रेल्वेचा वेग जास्त असल्यामुळे दोघांचे देह रेल्वेखाली छिन्नविच्छिन्न झाले आहेत. या दोन्ही मित्रांनी गेम खेळत असताना आपला जिव गमावला लागला आहे. या घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. हनुमान नगर येथील दोघे रहिवाशी असल्याची माहिती आहे. एकूणच मोबाईल गेममध्ये मग्न झाल्याने दोन्ही मित्रांना जिव गमवावा लागला आहे.

भररस्त्यावर तरुणीला जिवंत जाळलं, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

First published: March 16, 2019, 10:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading