लेकीच्या लग्नाऐवजी वडिलांचे अंत्यसंस्कार, डोळ्यांत पाणी आणणारी शेतकऱ्याची कहाणी

लेकीच्या लग्नाऐवजी वडिलांचे अंत्यसंस्कार, डोळ्यांत पाणी आणणारी शेतकऱ्याची कहाणी

सुरुवातीला कमी पाऊस तरी पीक चांगल होतं. याच पिकावर दिवाळी साजरी करून उन्हाळ्यात मुलींचं लग्न करायचं स्वप्न पाहत होते. पण अवकाळी पावसाने सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरलं.

  • Share this:

बीड, 06 नोव्हेंबर : मातीत स्वप्न पेरून जागता पहारा देणारा शेतकरी निसर्गाच्या बेभरवशी धोरणामुळे मेटाकुटीला आला आहे. राज्यात झालेल्या परतीच्या पावसानंतर होत्याचं नव्हतं झालं. यातच वयात आलेल्या मुलींचं लग्न कसं करावं या नैराश्येतून 37 वर्षीय शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. ओल्या दुष्काळाचं भयंकर वास्तव जीवावर उठलं. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील रामा बापूराव शिंदे (वय 37, रा. देवळा ता. वडवणी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.

मागच्या 5 वर्षाच्या दुष्काळाशी दोन हात करत संसाराचा गाडा ओढणाऱ्या रामा शिंदे यांनी यावर्षी 7 एकर जमीनीत कांदा आणि कापूस लावला. मेहनत केली सुरुवातीला कमी पाऊस तरी पीक चांगल होतं. याच पिकावर दिवाळी साजरी करून उन्हाळ्यात मुलींचं लग्न करायचं स्वप्न पाहत होते. पण अवकाळी पावसाने सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरलं.

दिवाळीमध्ये झालेल्या अतिवृष्टीने रामा शिंदेंसह अनेक शेतकर्‍यांच्या शेतात नद्या वाहिल्या. सात एक्करमध्ये पदरमोड करून महागमोलाचे बी-बियाणे खरेदी करून लागवड केली. रात्रंदिवस काबाड कष्ट करून पिकं जगवली. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला. या चिंतेतून त्यांनी रात्री विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत नातेवाईकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुलगी असा परिवार आहे.

BIG BREAKING - महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी बातमी, अमित शहांकडून 'इट्स फायनल'

दुसरी घटना धारूर तालुक्यातील भोगलवाडीमध्ये घडली. इथे प्रभाकर मुंडे या शेतकर्‍याने आज पहाटे चार वाजता बँकेचे कर्ज आणि सततच्या नापिकीला कंटाळून शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपविलं.

भोगलवाडी इथल्या प्रभाकर साहेबराव मुंडे (वय 45) या शेतकर्‍याने आपल्या मुलीच्या लग्नासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक, बीड आणि एसबीआय धारूर बँकेचे कर्ज घेतलेले होते. ते कर्ज न फिटल्याने तसेच सततच्या सुरू असलेल्या पावसाने दोन एकर सोयाबीन तसेच कापूस वाया गेल्याने आता कर्ज कसे फेडायचे? या चिंतेतून त्याने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे ओला दुष्काळ देखील शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 6, 2019, 10:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading