पवना धरणात खेळताना घसरला पाय, इंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू

पवना धरणात खेळताना घसरला पाय, इंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू

सकाळी 4च्या सुमारास काही मुली आणि 7 मुलं पवना धरण परीसरात फिरण्यासाठी आले होते.

  • Share this:

अनिस शेख, प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड, 09 एप्रिल : पवना धरणामध्ये 2 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हे विद्यार्थी एम.एम सी ओई मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधून पवना धरणात ब्राम्हणोली परिसरात फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सकाळी 4च्या सुमारास काही मुली आणि 7 मुलं पवना धरण परीसरात फिरण्यासाठी आले होते. दुपारी ११ वाजता पाण्यामध्ये उतरले असता पाण्यामध्ये पाय घसरून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सुजित जनार्दन घुले (वय 21) आणि रोहित कोटगिरे (वय २१) अशी मृतांची नावं आहेत.

सुजितचा मृतदेह दुपारी ३ वाजता स्थानिक नागरीकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आणि तो मृतदेह शविच्छेदनासाठी तळेगाव येथील जनरल हॉस्पिटल इथे पाठवण्यात आला. तर रोहित कोटगिरेचा मृतदेह शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या मदतीने 5:30च्या सुमारास बाहेर काढण्यात आला.

या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली असून लोणावळा ग्रामीणचे पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. तर मित्रांच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण कॉलेजवर शोककळा पसरली आहे.

VIDEO : स्कुटीच्या डिक्कीतून उडवले दीड लाख रुपये; चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद

 

First published: April 9, 2019, 7:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading