• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • भीषण अपघात.. देवदर्शन करून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

भीषण अपघात.. देवदर्शन करून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

देवदर्शन करून घरी परत येत असताना कोल्हापूरचे दोन जण या अपघातात जागीच ठार झाले आहे.

  • Share this:
कोल्हापूर,25 जानेवारी: पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. देवदर्शन करून घरी परत येत असताना कोल्हापूरचे दोन जण या अपघातात जागीच ठार झाले आहे. कोल्हापूरपासून 25 किलोमीटर अंतरावरच्या आप्पाचीवाडी उड्डाणपुलाजवळ शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. कोल्हापूरमधील सुरज सुलताने यांच्यासह त्यांचे कुटुंब आणि नातेवाईक हे दर अमावस्येला निपाणी जवळील तवंदी येथे देवदर्शनाला जात असतात. शुक्रवारीही देवदर्शनासाठी त्यांनी आपल्या ओम्नी व्हॅनमधून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत त्यांची आई, बहीण, भाचा, भाची बहिणीची मैत्रीण आणि शेजारी गेले होते. देवदर्शन करून रात्री घरी परतत असताना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आप्पाचीवाडी येथे उड्डाणपुलाजवळ ओमनी व्हॅन आणि ऊस भरलेला ट्रक यांचा भीषण अपघात झाला. यामध्ये व्हॅन चालवणारे सुरज सुलताने आणि श्रेया लागू हे दोघेही जागीच ठार झाले तर सुमेधा लागू, अमृता साळवी, अनिश साळवी, आर्या कुलकर्णी पौर्णिमा पंडित हे गंभीर जखमी झालेत. जखमींना तात्काळ कोल्हापुरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, सुरज आणि श्रेया लागू या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही बातमी समजताच मृत आणि जखमींच्या नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. बस पुलावरून कोसळून 20 जण जखमी मुंबई गोवा महामार्गावर एसटी बस पुलावरून कोसळुन मोठा अपघात झाला आहे. माणगावजवळ ही घटना घडली. या अपघातामध्ये जवळपास 20 जण जखमी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यापैकी 2 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झालेली बस मुंबईहून दापोलीकडे जात होती. परळहून दापोलीकडे जात असताना माणगावजवळ कळमजे इथे बस आली असता चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली. जखमींना रूग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.सर्व प्रवासी सुखरुप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Published by:Sandip Parolekar
First published: