गोव्यात पोर्तुगीजकालीन पूल कोसळला, दोघांचा मृत्यू, 48 जणांना वाचवण्यात यश

गोव्यात पोर्तुगीजकालीन पूल कोसळला, दोघांचा मृत्यू, 48 जणांना वाचवण्यात यश

  • Share this:

19 मे : दक्षिण गोव्यातील सावर्डे गावात असणारा पोर्तुगीजकालीन पूल 50 जण नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. यात दोघांचा मृत्यू झाला असून  48 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

झुआरी नदीवर हा पूल होता आणि तो जीर्ण झाला होता. याच पुलावरुन एका युवकानं नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर नागरिकांनी ही घटना पाहण्यासाठी या जुन्या पुलावर मोठी गर्दी केली होती. जवळपास 50 हून अधिक लोक या पुलावर जमले होते. त्याचवेळी हा पूल अचानक नदीत कोसळला आणि अनेकजण नदीत बुडाले.

या पूलावरील 50 लोक नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. काही जण स्वत: पोहून बाहेर आले, तर पण त्याच ठिकाणी  इतरांना आत्महत्या केलेल्या युवकाला वाचवण्यासाठी जमलेल्या कोस्टलच्या कर्मचारी आणि इतर नागरिकांनी वाचवले.

या घटनेत आत्महत्या केलेल्या युवकासह 2 जणांचा मृत्यू झालाय. याप्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत या नदीच्या पाण्यात बचावकार्य सुरू होतं.

दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याशी बोलणे झाले असल्याची माहिती ट्विटरवरून दिली. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2017 12:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading