नवी दिल्ली, 12 मे : जागतिक दहशतवादाच्या अग्रस्थानी असलेल्या ISISनं आपला मोर्चा आता भारताकडे वळवला आहे. भारतात पहिली शाखा सुरू केल्याचं ISISनं म्हटलं आहे. 10 मे रोजी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीनंतर ISISनं भारतातील शाखेबद्दल घोषणा केली आहे. ISISचं मुखपत्र असलेल्या अमाकच्या मते त्यांच्या भारतातील शाखेचं नाव हे विलायाह ऑफ हिंद आहे. त्यामुळे ISISनं आपला मोर्चा भारताकडे वळवल्याचं दिसून येत आहे. पण, जम्मू – काश्मीरमधील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं मात्र या बातमीचं खंडन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण
काय म्हणाला वरिष्ठ पोलिस अधिकारी
कट्टर पंथीयांवर नजर ठेवणाऱ्या SITE ग्रुपच्या सदस्या रिता काटज यांच्या म्हणण्यानुसार ISISची अमशिपुरा इथं भारतीय जवानांसोबत चकमक उडाली. त्यांनतर ISISनं याबाबतची घोषणा केली. दरम्यान, या गोष्टीला गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचं काटज यांनी म्हटलं आहे.
ISISनं शाखा नेमकी कुठं उघडली गेली? याबाबत काहीही माहिती दिली नाही. पश्चिम अशियामध्ये पुन्हा एकदा आपली दहशत पसरवण्यासाठी ISISनं शाखा उघडली असावी असा अंदाज आहे. ISISप्रमुख अबू बक्र बगदादीनं यापूर्वीच याबाबतची माहिती दिली आहे.
VIDEO : 'काँग्रेसच्या 70 वर्षांच्या सत्तेत कुणालाच न्याय मिळाला नाही'