PHOTO नीट पाहा! येरवडा जेलमधून पळून गेले हे दोन कैदी, आहेत कोरोना पॉझिटिव्ह

PHOTO नीट पाहा! येरवडा जेलमधून पळून गेले हे दोन कैदी, आहेत कोरोना पॉझिटिव्ह

वेताळ आणि खरात हे गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. ते सध्या न्यायालयीन कोठडीत होते.

  • Share this:

पुणे, 10 सप्टेंबर : कोरोनाचा धोका राज्यात दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये रोज कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर होते. अशात पुण्यातून एक हादरवून सोडणारी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा इथल्या कारागृहातून कैदी पळून जाण्याचे सत्र सुरुच आहे. या कारागृहातून पुन्हा एकदा दोन कैद्यांनी धूम ठोकली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हे दोन्ही कैदी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाची झोप उडाली आहे. दोन्ही कैद्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

अनिल विठ्ठल वेताळ (वय 21, रा- गणेश नगर, भीमा कोरेगाव, ता-शिरूर, जि- पुणे) आणि विशाल रामधन खरात (घर नं 5, फातिमा मशिदीसमोर श्री समर्थ हौसिंग सोसायटी, निगडी, पुणे) अशी पळून गेलेल्या कैद्यांची नाव आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे हे कैदी कुठेही दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधा असं आवाहन करण्यात आलं आहे.

शिवसेनेत खळबळ! आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण, अधिवेशनालाही होते उपस्थित

वेताळ आणि खरात हे गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. ते सध्या न्यायालयीन कोठडीत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना तात्पुरत्या कारागृहाच्या इमारत क्रमांक 104 मधील पहिल्या मजल्यावरील रुम नंबर 1 मध्ये ठेवण्यात आले होते. संधीचा फायदा घेत त्यांनी येथून पळ काढला.

दोन्ही कैदी हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. यापूर्वीही तात्पुरत्या कारागृहातून कैदी पळून गेले होते. यातील काहींना नंतर पुन्हा अटक करण्यात आली होती. एकीकडे असे प्रकार वारंवार समोर येत असताना दुसरीकडे पुण्यात कोरोनाचा धोका वाढत आहे.

पुणे हादरलं! मॉलमध्ये जातोय सांगून नेलं लॉजमध्ये, वारंवार केले युवतीवर बलात्कार

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. देशात पुणे सर्वात वरच्या क्रमांकावर गेलं आहे. अशी परिस्थिती असतांना बुधवारी पुणे जिल्ह्यातल्या मंचरमध्ये 24 तासांमध्ये 176 रुग्ण आढळून आलेत त्यामुळे एकच खळबळ उडाली. एखाद्या गावात एकाच दिवशी सर्वाधिक रूग्ण सापडण्याची ही देशातली ही पहिलीच घटना आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांची न्यूज18 लोकमतला ही माहिती दिली. त्यामुळे मंचर पुणे जिल्ह्यातील नवा कोरोना हॉटस्पॉट बनला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 10, 2020, 1:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading