पावसाचा आनंद घेणं या चिमुकल्यांना पडलं महागात, खड्ड्यात बुडून दोघांचा मृत्यू

पावसाचा आनंद घेणं या चिमुकल्यांना पडलं महागात, खड्ड्यात बुडून दोघांचा मृत्यू

गेल्या काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचलं आहे. हे दोघे त्याठिकाणी पोहण्यासाठी गेले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

  • Share this:

कल्याण, 09 जुलै : कल्याणनजीक बल्याणीमध्ये दोन मुलांचा बुडून मृत्य झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मातीसाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ात पडून या दोघांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचलं आहे. हे दोघे त्याठिकाणी पोहण्यासाठी गेले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

चाळ माफियांकडून हे खोदकाम केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास टिटवाळा पोलीस करीत आहे. टिटवाळामध्ये नांदप ग्रामपंचायतीच्या हद्दीत बल्याणी परिसरात एका चाळीत राहणाऱ्या 11 वर्षाचा मयंक सुनिल शर्मा आणि 12 वर्षाचा पियूष पवन पाठक दोघेही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. शाळा सुटल्यानंतर पावसाचा आनंद लुटण्यासाठी हे दोघे नजीकच्या एका मोठया खोदलेल्या खडय़ात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते.

3 तासानंतरही ते घरी आले नसल्याने घराच्या मंडळींनी या दोघांचा शोध सुरू केला. खड्डय़ाच्या बाजूला दोघांच्या पायातील चप्पल सापडली. त्यावेळी काही लोक खडय़ात साचलेल्या पाण्यात उतरले. 15 फूट खोल असलेल्या खड्डय़ात दोघांचे मृतदेह मिळून आले. या दोघांचे मृतदेह कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

मातीसाठी चाळमाफियांनी खड्डा खोदला होता असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, टिटवाळा पोलिस सर्व अंगानी या घटनेचा तपास करीत आहेत. दरम्यान, घरातील मुलांना अशा पद्धतीने गमावल्यामुळे दोघांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर यावर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

ट्रकच्या भीषण धडकेनंतर ST बसने घेतला पेट, 23 प्रवासी जखमी

औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृहसमोर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर एसटीबसने पेट घेतल्यामुळे यात 23 प्रवासी जखमी झाली असून 7 जण गंभीर जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. रात्री दिड ते दोनच्या सुमारास अपघात झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं.

बसमधील सुमारे 23 प्रवासी जखमी झाले आहेत. एसटी बस चालक आणि वाहक या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. या दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर बसने जागेवर पेट घेतला. आगीत बस पूर्ण जळून खाक झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे एसटी महामंडळाच्या नगर विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

येत्या 24 तासांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा...

आज म्हणजेच मंगळवारी मुंबईवर अस्मानी संकट येण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी मुंबईकरासाठी हाय अलर्ट जारी केला आहे. 200 मिली पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. आज ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासांत बरसणारा हा पाऊस जोरदार आहे. त्यामुळे अतिमुसळधार पावसामुळे पोलिसांनी मुंबईकरांना शक्य असेल तरच घराबाहेर पडा अशा सुचना केल्या आहेत.

VIDEO: खासदार इम्तियाज जलील अडचणीत, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: July 9, 2019, 10:13 AM IST

ताज्या बातम्या