पोटच्या 2 चिमुरड्यांना फासावर लटकावून जन्मदात्रीनेही केली आत्महत्या

पोटच्या 2 चिमुरड्यांना फासावर लटकावून जन्मदात्रीनेही केली आत्महत्या

पोटच्या 2 चिमुरड्यांना फासावर लटकावून जन्मदात्री आईने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. जिल्ह्यातील तोंडगाव इथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

  • Share this:

किशोर गोमाशे, (प्रतिनिधी)

वाशिम, 18 जुलै- पोटच्या 2 चिमुरड्यांना फासावर लटकावून जन्मदात्री आईने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. जिल्ह्यातील तोंडगाव इथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. जयश्री गजानन गवारे (वय-28), गणेश (वय- 5) आणि मोहित (वय-3) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी की, तोंडगाव माहेर असलेल्या जयश्री गजानन गवारे या विवाहितेने घरी कुणीच नाही, हे पाहून दरवाजा आतून बंद केला. मोठा मुलगा गणेश आणि

धाकटा मोहितला आधी फासावर लटकावले. नंतर तिने स्वतः ही गळफास लावून घेत आत्महत्या केली. जयश्री ही मागील 3 वर्षांपासून माहेरीच राहत होती. तिचा पती दारू पिऊन नेहमी मारहाण करत होता. त्यामुळे ती माहेरी आली होती. त्यांच्यामधील वादाचा खटला वाशिम न्यायालयात सुरू आहे. हा खटला अंतिम टप्प्यात असल्याने आपणास काही दिवसांनी नवऱ्याकडे जावे लागेल, या विवंचनेत ती होती. यातूच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. या तिहेरी आत्महत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

तरुणाने रेल्वेखाली केली आत्महत्या...

वरोरा शहराच्या हद्दीत रमेश मिलमीले या 26 वर्षीय तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली. रमेश हा बांधकाम कामगार म्हणून काम करत होता. संध्याकाळी कामावरून परतला आणि दवाखान्यात जातो, अस सांगून तो गेला होता. परंतु घरी परतलाच नाही. रमेशच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

VIDEO: लष्करी अळीमुळे बळीराजा हवालदिल; उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

First published: July 18, 2019, 5:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading