जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या 2 जवानांना वीरमरण

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या 2 जवानांना वीरमरण

औरंगाबादचे सैनिक संदीप जाधव आणि कोल्हापूरचे श्रावण माने शहीद झाले आहे.

  • Share this:

22 जून : जम्मू आणि काश्मीरमधील पुँछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आलंय. औरंगाबादचे सैनिक संदीप जाधव आणि कोल्हापूरचे  सावन माने शहीद झाले आहे.

सीमारेषेवर आज पुन्हा दहशतवादी आणि पाक सैन्यांनं डोकंवर काढलं. भारतीय सीमारेषेत 600 मीटर आत घुसखोरी करून भारतीय चौक्यांवर पाक सैनिक आणि दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. भारताने चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्यांचा खात्मा केला.

आज दुपारी 2 च्या सुमारास पुँछ सेक्टरमध्ये पाक सैनिकांनी भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचा एक जवान जखमी झाला. गोळीबार सुरू असतानाच पाक सैनिकांनी  त्याला उचलून नेलं. पाकच्या बॅट अर्थात बाॅर्डर अॅक्शन टीमने हा हल्ला केला. या टीममध्ये पाक सैनिक आणि दहशतवाद्यांचा समावेश असतो.

या गोळीबारात औरंगाबादचे नायक संदीप जाधव (वय 35) आणि कोल्हापूरचे शिपाई सावन माने (वय 25) शहीद झाले. संदीप जाधव हे मौजे केळगाव ता. सिल्लोड येथील रहिवासी होते. गेल्या 15 वर्षांपासून सैन्यात कार्यरत होते.

कोल्हापूरचे सावन माने यांना वयाच्या 25 व्या वर्षी वीरमरण आलं. चारच वर्षांपूर्वी सावन माने सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2017 09:19 PM IST

ताज्या बातम्या