परळीत भर गर्दीत रिव्हॉल्वर, जिवंत काडतूसं घेऊन फिरत होते आरोपी, पोलिसांनी घेतलं ताब्यात

परळीत भर गर्दीत रिव्हॉल्वर, जिवंत काडतूसं घेऊन फिरत होते आरोपी, पोलिसांनी घेतलं ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या आरोपीसोबत आणखी एकजण आढळून आला. रिव्हॉल्व्हरसह तीन जिवंत काडतूसं बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी दुपारी उशीरा ताब्यात घेतले आहे.

  • Share this:

परळी, 17 नोव्हेंबर : परळीत रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसांसोबत दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. परळी शहरात आज सकाळी रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांना एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली. त्याची झाडाझडती घेतली असता एक रिव्हॉल्व्हर सह 3 जिवंत काडतुसे त्याच्याजवळ आढळून आली. भर रस्त्यात असा प्रकारे अज्ञात व्यक्ती रिव्हॉल्वर घेऊन फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या सगळ्या प्रकाराची पोलीस आता चौकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या आरोपीसोबत आणखी एकजण आढळून आला. रिव्हॉल्व्हरसह तीन जिवंत काडतूसं बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी दुपारी उशीरा ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलीस चौकशी सुरू आहे. या दोघात रिव्हॉल्वर खरेदी-विक्री होत असावी असा संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने दोघांचीही कसुन चौकशी सुरू आहे

या घटनेबाबत परिसरात माहिती मिळाल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना याची माहिती द्या असा संदेश पोलिसांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, काही घातपात होण्याची शक्यता होती का? याचाही पोलीस शोध घेत आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 17, 2019, 4:49 PM IST
Tags: beed news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading