दोन मित्रांची दिवाळी ठरली अखेरची, शेततळ्यात बुडून 16 वर्षीय मुलांचा मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या दोन 16 वर्षीय मुलांचा शेततळयात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2019 07:00 PM IST

दोन मित्रांची दिवाळी ठरली अखेरची, शेततळ्यात बुडून 16 वर्षीय मुलांचा मृत्यू

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 28 ऑक्टोबर : महाराष्ट्रभर दिवाळीचा उत्सव जोरात सुरू असताना महाराष्ट्रात हत्या आणि अपघाताच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. जालन्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा शेततळयात बुडून मृत्यू झाला आहे. ऐन दिवाळीच्या उत्सवात घरातील लहान मुलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घनसावंगी तालुक्यातील मंगुजळगाव इथे ही घटना घडली आहे.

पोहण्यासाठी गेलेल्या दोन 16 वर्षीय मुलांचा शेततळयात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. संदीप खरात आणि राम कांबळे अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन मुलांची नावं आहेत. आज दुपारच्या सुमारास 4 मुलं शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. यापैकी राम आणि संदीपला पोहता येत नसल्यानं त्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परीसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात दिवाळीला गालबोट लागलं आहे असंच म्हणावं लागेल. कारण औरंगाबाद आणि नागपूरमध्ये हत्येच्या 2 धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना औरंगाबादनंतर आता नागपूरमध्ये हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या उदयनगर चौकात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दिवाळीच्या सणाला तरुणाची हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी लक्ष्मीपुजनाच्या रात्री एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

Loading...

इतर बातम्या - दिवाळीला गालबोट, Happy Diwali म्हटला म्हणून तरुणाची तलवारीने हत्या

रात्री बारा वाजताच्या दरम्यान हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत उदयनगर चौकातील जितू बडे (वय 29) नावाच्या तरुणाची तीन आरोपींनी चाकूने भोसकून हत्या केली. आपापसात झालेल्या शुल्लक वादातून ही हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मारेकरी हुडकेश्वर शेष नगरातील असून यात प्रसाद रोकडे नावाच्या आरोपीचा समावेश आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

पोलिसांना हत्येची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पोलिसांनी जितूचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शववच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर घरातील तरुण मुलाल अशा प्रकारे गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करणारे तीन आरोपी असून तिन्ही आरोपी फरार आहेत. त्यानुसार पुढील तपास सुरू असल्याचेही हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी सांगितलं. दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस घटनास्थळी स्थानिक नागरिकांची चौकशी करत असल्याचीही माहिती आहे.

इतर बातम्या - दिवाळीला गालबोट, Happy Diwali म्हटला म्हणून तरुणाची तलवारीने हत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2019 07:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...