मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोरोनाच्या लढ्याच्या वेळी यांना सुचतंय राजकारण; ठाकरे आणि फडणवीस समर्थकांमध्ये ऑनलाइन जुंपली

कोरोनाच्या लढ्याच्या वेळी यांना सुचतंय राजकारण; ठाकरे आणि फडणवीस समर्थकांमध्ये ऑनलाइन जुंपली

सध्या नागरिक कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहे तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात वेगळीचं गणितं मांडली जात आहे

सध्या नागरिक कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहे तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात वेगळीचं गणितं मांडली जात आहे

सध्या नागरिक कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहे तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात वेगळीचं गणितं मांडली जात आहे

मुंबई, 19 मार्च : सध्या संपूर्ण जग कोरोनासारख्या (Covid - 19) भयंकर आजाराशी लढा देत आहे. मात्र राज्यातील नेत्यांना राजकारण सुचतंय. अशा कठीण प्रसंगी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. मात्र आपल्याक़डे तर ठाकरे व फडणवीस समर्थकांमध्ये ट्विटर युद्ध सुरू आहे. आज सकाळी भाजपचे (BJP) नेते निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की, ‘ सध्या महाराष्ट्राला शून्य प्रवासाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadanvis) गरज आहे.’ यावर सायंकाळी ठाण्याचे महापौर व शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संबंधित - गोमूत्र पार्टी पडली महागात, आजारी पडलेल्या स्वयंसेवकाची BJP नेत्याविरोधात तक्रार त्यांनी दोन पोस्ट केले आहेत. पहिल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, ‘दिन मे तारे देखना बंद करो बाबू....हे म्हणजे नव्या सुनेने मोठ्या सुनेला सासर कसं आहे हे सांगणे झालं..उद्धवजी समर्थ आहेत. तुमचे डाव खरे झाले नाहीत त्यामुळे सल्ले देणं फक्त तुमच्या हातात आहे.’ याशिवाय दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी आधी व्याकरण शिका, त्याची तुम्हाला नितांत गरज असल्याचे म्हटले आहे. याशिवाय ‘भाजपच्या आमदारांना झाली आहे फडणवीसांची कावीळ’ असा टोमणाही लगावला आहे. राज्यात आतापर्यंत 49 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर देशात 175 जण कोरोनाग्रस्त आहे. अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांमध्ये ट्विटरयुद्ध सुरू आहे.
First published:

Tags: Narendra modi, NCP, भाजप, शिवसेना

पुढील बातम्या