मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना दणका, आयोगानंतर आता ट्विटरने केली कारवाई

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना दणका, आयोगानंतर आता ट्विटरने केली कारवाई

आयोगाच्या आदेशानंतर ट्विटर इंडियाने आदित्यनाथ यांचे ट्वीट भारतात ब्लॉक केले आहेत.

  • Share this:

लखनऊ/नवी दिल्ली, 17 एप्रिल: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यावर आयोगाने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आक्षेपार्ह ट्विट केले होते. यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. आयोगाच्या आदेशानंतर ट्विटर इंडियाने आदित्यनाथ यांचे ट्वीट भारतात ब्लॉक केले आहेत. याशिवाय ट्विटर इंडियाने भाजपचे नेते गिरीराज सिंह, एमएलए मनजिंदर सिंह सिरसा, अभिनेत्री कोयना मित्रा यांचे सर्वांच्या मिळून वादग्रस्त 34 ट्विटवर कारवाई केली आहे. हे सर्व ट्वीट डिलीट करण्यात आले आहेत किंवा ते भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत.

योगी आदित्यनाथ यांनी ट्विटवर, 'मुस्लिम लीग एक वायरस है। एक ऐसा वायरस जिससे कोई संक्रमित हो गया तो वो बच नहीं सकता और आज तो मुख्य विपक्षी दल कांग्रेस ही इससे संक्रमित हो चुका है। सोचिये अगर ये जीत गए तो क्या होगा ? ये वायरस पूरे देश मे फैल जाएगा।', अशी पोस्ट केली होती. याची दखल घेत आयोगाने नोटीस बजावली होती. अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी '1857 के स्वतंत्रता संग्राम में मंगल पांडे के साथ पूरा देश अंग्रेजों के खिलाफ मिल कर लड़ा था, फिर ये मुस्लिम लीग का वायरस आया और ऐसा फैला कि पूरे देश का ही बंटवारा हो गया। आज फिर वही खतरा मंडरा रहा। हरे झण्डे फिर से लहर रहे। कांग्रेस मुस्लिम लीग वायरस से संक्रमित है, सावधान रहिए।', असे म्हटले होते.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. वायनाडमधून अर्ज दाखल करताना राहुल गांधी यांच्या सोबत मुस्लिम लीगचे नेते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या इंडियन युनियन मुस्लिम लीगची स्थापना मोहम्मद अली जिन्ना यांनी केली होती.

योगींच्या या ट्विटवर काँग्रेससह विरोधी पक्षांनी देखील टीका केली होती. यासंदर्भात आयोगाकडे तक्रार देखील करण्यात आली होती. आता ट्विटरने योगींनी केलेले वादग्रस्त ट्विटवर भारतात बंदी घेतली आहे. योगींच्या ट्विटवर बंदी घालण्याआधी आयोगाने त्यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर प्रचारासाठी 72 तासांची बंदी घेतली होती.

निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदींनी असं वापरलं जातीचं कार्ड पाहा UNCUT भाषण

First published: April 17, 2019, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading